मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुणे: विहिरीत पडलेल्या महिलेला मिळालं जीवदान; अवघ्या साडेतीन मिनिटांत अग्निशमन दल घटनास्थळी

पुणे: विहिरीत पडलेल्या महिलेला मिळालं जीवदान; अवघ्या साडेतीन मिनिटांत अग्निशमन दल घटनास्थळी

(File Photo)

(File Photo)

पुणे शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या एका विहिरीत महिला पाय घसरून पडल्याची घटना (woman fell into well) समोर आली आहे. महिला विहिरीत पडल्यानंतर, अवघ्या साडेतीन मिनिटात अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे

  • Published by:  News18 Desk

पुणे, 09 नोव्हेंबर: पुणे (Pune) शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या एका विहिरीत महिला पाय घसरून पडल्याची (woman fell into well) घटना समोर आली आहे. महिला विहिरीत पडल्यानंतर, अवघ्या साडेतीन मिनिटात अग्निशमन दल घटनास्थळी दाखल (Fire brigade reached in just 3 and half minutes) झालं आहे. यामुळे संबंधित महिलेचा जीव वाचला आहे. संबंधित महिला विहिरीतील गाळात हळुहळू फसू लागली होती, तसेच तिची शुद्धही हरपत चालली होती. पण घटनेची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत अग्निशमन दल घटना स्थळी दाखल झाल्याने महिलेचा जीव वाचला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाचं भरभरून कौतुक केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील सोमवार पेठेत पेशवेकालीन दांडेकर वाड्यात जुनी विहीर आहे. ही विहीर गाळ आणि पाल्यापाचोळ्यांनी भरली आहे. या वाड्यात कोणीही राहत नाही, तसेच विहिरही वापरात नाही. पण या विहिरीजवळ एक नळ आहे. याठिकाणी पाणी भरण्यास गेली असता, संबंधित महिला विहिरीत पडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

हेही वाचा-मंजूर कर्ज देण्यास 3वर्षे टाळाटाळ; हवालदिल शेतकऱ्याने बँकेबाहेरच केला भयावह शेवट

सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास 42 वर्षीय महिला विहिरीत पडल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या भवानी पेठेतील केद्रातून एक बंब, देवदूत आणि रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी दाखल झालं. ही मदत अवघ्या साडेतीन मिनिटांत याठिकाणी पोहोचली.

हेही वाचा-'अँटीलीया'चा पत्ता विचारणाऱ्या एकाची पटली ओळख; मुंबई पोलिसांकडून मोठा खुलासा

तोपर्यंत संबंधित महिला विहिरीतील गाळात हळुहळू फसू लागली होती. पण तिच्या अंगावरील गाऊनचा फुगा झाल्याने काही वेळ ती गाळाच्या पाण्यात तरंगली. त्यानंतर तिची शुद्धही हरपत चालली होती. पण अग्निशमन दल वेळेत घटनास्थळी दाखल झाल्याने संबंधित महिलेचा जीव वाचवण्यात यश आलं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी लाइफ जॅकेट आणि दोरखंडाच्या साह्याने महिलेला बाहेर काढलं आहे. यासाठी काही जवान विहिरीत उतरले होते. विहिरीतून बाहेर काढल्यानंतर संबंधित महिलेस जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Pune