• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • पुण्यात कडक लॉकडाऊन लावणार का? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

पुण्यात कडक लॉकडाऊन लावणार का? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

ऑक्सिजन पुरवठा सुरळीत आहेत, ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. अशा स्थिती आणखी कडक लॉकडाऊनची गरज नाही' अशी रोखठोक भूमिका महापौरांनी घेतली.

  • Share this:
पुणे, 08 मे : 'पुणे (Pune) शहरात कोरोनाचा (Pune lockdown) वाढत प्रादुर्भाव पाहता कडक लॉकडाऊन लावा' अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) दिल्यानं खळबळ माजली आहे. 1 लाखांपेक्षा जास्त (Corona positive) रुग्ण आहेत असं सांगत न्यायालयाने मुंबईशी तुलना करत पुण्यात कोरोना रोखण्यासाठी अशा उपाय योजना का करत नाही, असा सवालही सरकारला विचारला. पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर बोलताना पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी न्यायालयाला सूचना करण्याचा अधिकार आहे मात्र आणखी कडक लॉकडाऊन लावायचा का? हे राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील असं स्पष्टपणे सांगितलं. 'कोरोनाचे रुग्ण शहरात कमी होत आहे, मात्र ग्रामीण भागात वाढत आहेत.ऑक्सिजन तुटवडा नाहीये. मात्र लशी नसल्यानं लसीकरणाचा वेग मंदावला आहे. सिरम संस्थेचे आदर पुनावाला हे परदेशात आहेत ते 10 ,15 दिवसांनी परतल्यावर त्यांना लशी विषयी विचारू, असं पवार म्हटले. दुसरीकडे पुण्याचे महापौर मुरली मोहोळ यांनी मात्र 'न्यायालयात जी आकडेवारी मांडण्यात आली ती जुनी आहे तसंच ती पूर्ण जिल्ह्याची आहे. गेल्या 15 दिवसात 15 हजार सक्रिय रुग्ण संख्या कमी झाली. पुण्यात 66 हजाराहुन आता 39 हजार इतकी या घडीला positive रुग्ण संख्या आहे. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत आहेत, ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. अशा स्थिती आणखी कडक लॉकडाऊनची गरज नाही' अशी रोखठोक भूमिका महापौरांनी घेतली. ‘भूकेने व्याकूळ होतो अन्..’; पाहा दिलीप कुमार यांच्या डायलॉगचं कोरोना कनेक्शन तथापि कोर्टात पुणे महापालिका प्रतिज्ञापत्र सादर करून वस्तुस्थिती मांडेल, कारण नागरिकांमध्ये कडक लॉकडाऊन लागेल अशा बातम्यांमुळे नाहक भीती पसरेल, असंही मुरलीधर मोहोळ म्हणाले. भारतीयांचं कौतुक करणं इम्रान खानला पडलं महागात; पाकिस्तानींना राग अनावर यामुळे कोर्टात नेमकी जुनी माहिती कुणी आणि का दिली असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय ही आकडेवारी जर संपूर्ण जिल्ह्याची असेल तर मग शहरात रुग्ण संख्या कमी होत असताना कडक लॉकडाऊन लावावा का हाही सवाल निर्माण झाला. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्याबाबत काय निर्णय घेतात तसंच पुढील सुनावणीवेळी महापालिका जेव्हा प्रतिज्ञापत्र मांडेल तेव्हा कोर्ट परत काय सूचना देईल याकडे पुणेकरांचे लक्ष असेल.
Published by:sachin Salve
First published: