पुण्यात दारूची विक्री होणार की नाही? 'या' कारणामुळे निर्माण झाला संभ्रम

पुण्यात दारूची विक्री होणार की नाही? 'या' कारणामुळे निर्माण झाला संभ्रम

राज्य सरकारने मद्यविक्रीबाबत असा निर्णय घेतलेला असताना पुणे शहरात मात्र मद्यविक्री परवानगीबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे.

  • Share this:

पुणे, 4 मे : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाल्यानंतर आता निर्बंध शिथिल करण्यासाठी सरकारने पाऊल उचललं आहे. मुंबई आणि पुणे शहरात आजपासून वाईन शॉप खुले राहतील, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव आणि कोविड नियंत्रण कक्ष प्रमुख भूषण गगराणी यांनी दिली आहे. राज्य सरकारने लॉकडाऊनमधील काही नियम शिथिल केले आहेत. रेड झोनमध्ये अत्यावश्यक दुकानाशिवाय इतर दुकानांना परवानगी देण्यात आली आहे.

मुंबई, पुण्यात वाईन शॉप सुरु करण्यात येणार आहेत. मात्र, सोशल डिसेटन्स नियम आणि पाच लोकांपेक्षा जास्त लोक दुकानात नसतील, याची खबरदारी घेतली जाईल. तसेच स्थानिक पोलीस लक्ष देतील, असे निर्बंध घालण्यात आले आहेत. रेस्टॉरंट, बार मात्र बंद राहतील.

एकीकडे राज्य सरकारने मद्यविक्रीबाबत असा निर्णय घेतलेला असताना पुणे शहरात मात्र मद्यविक्री परवानगीबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे. कारण जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अद्याप कोणतेही आदेश काढलेले नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनीच अद्याप आदेश दिले नसल्याने दारूची दुकानं उघडता येणार नाही की नाही, याबाबतचा संभ्रम निर्माण झाला आहे.

दरम्यान, पुणे महानगर पालिकेने शहरात एकूण 69 प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहेत. शहरातील प्रतिबंधित क्षेत्र आणि विनाप्रतिबंधित क्षेत्राबाबत मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी नवे आदेश काढले आहेत. नव्या आदेशानुसार पुण्यातील जाहीर करण्यात आलेल्या 69 प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध यापुढेही कायम राहतील. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी शासन निर्णयानुसार सवलती मिळणार आहेत.

हेही वाचा - 2 वर्षे तरी कोरोनाव्हायरसला रोखणं शक्य नाही, तज्ज्ञांचा दावा

या प्रतिबंधित क्षेत्रात बंदी कायम..

मंगळवार पेठ, जूना बाजार, पर्वती दर्शन परिसर 1, 2, पर्वती चाळ क्र. 52 झोपडपट्टी, पर्वती दांडेकर पूल झोपडपट्टी, पर्वती दत्तवाडी, पर्वती इंदिरानगर झोपडपट्टी नीलामय टॉकीज 1, 2, शहर मध्यवर्ती भाग कसबा, नाना भवानी पेठ, कोंढवा बुद्रुक, काकडे वस्ती, कोंढवा बुद्रुक, नॉटिंग हिल सोसायटी, उंड्री, होलेवस्ती, कात्रज, सुखसागरनगर, अंबामाता मंदिर परिसर, कोथरूड, शिवतारा इमारत बधाई स्वीटजवळ, कोथरूड चंद्रगुप्त सोसायटी, महाराज कॉम्प्लेक्स मार्ग, पुणे स्टेशन, ताडीवाला रस्ता, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन दक्षिणेकडील वसाहत, घोरपडी, बालाजीनगर, विकासनगर, पर्वती, तळजाई वस्ती 1, 2, धनकवडी, बालाजीनगर, पर्वती शिवदर्शन 1, 2, धनकवडी, गुलाबनगर चैतन्यनगर, आंबेगाव खुर्द जांभूळवाडी, साईसमृध्दी परिसर, वडगावशेरी, गणेशनगर, रामनगर, टेम्पो चौक, लोहगाव, कालवडवस्ती, बिबवेवाडी, आंबेडकरनगर, मार्केट यार्ड, गुलटेकडी, डायसप्लॉट, मीनाताई ठाकरेनगर, बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी स. नं. 650, गुलटेकडी, सेव्हन डे अ‍ॅडव्हेंटीज मिशन, बिबवेवाडी, ढोलेमळा झोपडपट्टी, प्रेमनगर झोपडपट्टी, येरवडा गांधीनगर, गांधीनगर 2, ताडीगुत्ता, नागपूर चाळ, आदर्श इंदिरानगर, आळंदी रस्ता, फुलेनगर, आळंदी रोड, कळस, जाधववस्ती, येरवडा प्रभाग क्र. 6, हडपसर रामनगर, रामटेकडी, गोसावीवस्ती, वैदूवाडी, हडपसर सय्यदनगर 1, 2, 3, गुलामअलीनगर, कोंढवा खुर्द शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, तांबोळी बाजार, कोंढवा खुर्द मिठानगर, वानवडी एसआरपीएफ, शिवाजीनगर कामगार पुतळा, महात्मा गांधी झोपडपट्टी, पाटील इस्टेट, शिवाजीनगर रेल्वे लाइन उत्तरेकडील बाजू, शिवाजीनगर न. ता. वाडी, कामगार आयुक्त कार्यालयालगतची झोपडपट्टी, कॉँग्रेसभवन पाठीमागील बाजू, हडपसर चिंतामणीनगर, रेल्वे गेटजवळ, हडपसर आदर्श कॉलनी, वेताळनगर, सातववाडी, हडपसर माळवाडी, हांडेवाडी रस्ता, इंदिरानगर.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 4, 2020, 8:54 AM IST

ताज्या बातम्या