राज्यात पुन्हा लॉकडाउन लागणार? अजितदादांनी दिले स्पष्ट उत्तर

'कोरोनाची (Corona) खबरदारी घेण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहे. त्यामुळे जे कोविड सेंटर (Covid Center) बंद करण्यात आले आहे. ते सेंटर तातडीने सुरू करता येईल'

'कोरोनाची (Corona) खबरदारी घेण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहे. त्यामुळे जे कोविड सेंटर (Covid Center) बंद करण्यात आले आहे. ते सेंटर तातडीने सुरू करता येईल'

  • Share this:
    पुणे, 22 नोव्हेंबर : राज्यात (maharashtra) पुन्हा कोरोनाची (Corona) दुसरी लाट येणार अशी भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाउन (Lockdown) लागणार का? अशी चर्चा रंगली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारली नाही. तसंच, 'राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि परिस्थिती पाहून पुढचा निर्णय घेतला जाईल', असंही अजित पवारांनी स्पष्ट केले. पुण्यात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी कोरोनाच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. 'अहमदाबादमध्ये रात्रीचे लॉकडाउन करण्यात आले आहे. राज्यातील परिस्थितींचा आढावा घेतला जात आहे. आणखी 10 ते 15 दिवस राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल', असंही अजित पवार म्हणाले. सेक्सची इच्छा आणि स्लिम होण्यासाठी अनेक अभिनेत्री घेतात ड्रग्स, सप्लायरचा खुलासा राज्यात पुन्हा लॉकडाउन लागणार का? असा सवाल केला असता अजितदादा म्हणाले की, 'परिस्थिती कशा प्रकारची समोर येणार हे त्यावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे आताच मी काही घोषणा करणे योग्य ठरणार नाही. मी आज काही बोललो तर लोकं जास्त त्रस्त होतील. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या किती आणि कशी वाढते यावर पुढचा निर्णय अवलंबून असणार आहे.' 'कोरोनाची खबरदारी घेण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहे. त्यामुळे जे कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे. ते सेंटर तातडीने सुरू करता येईल. व्हेंटिलेटर बेड, साधे बेड हे खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून दिले होते, आता जर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली तर पूर्ण क्षमतेनं सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल', असंही अजित पवार यांनी सांगितलं. मनसे प्रमुख राज ठाकरे यांना सोबत घेणार का? देवेंद्र फडणवीसांनी दिलं 'हे' उत्तर 'कोरोना आजारावर कोणतीही लस आलेली नाही. रोज बातम्या ऐकतोय लस आलीये, उद्या येणार आहे. इथं माणूस मरायला टेकला आहे. यांची लस अजून यायला तयार नाही. पण, खबरदारी बाळगा, अजून लस आलेली नाही. त्यामुळे सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी', असं आवाहनही अजित पवार यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणेकडे लक्ष्य दरम्यान, आज रात्री 8 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  जनतेशी फेसबुक, युट्यूबवर लाईव्ह व्हिडीओच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन ते काही महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ, देवेंद्र फडणवीसांनी दागली टीकेची तोफ गेल्या काही दिवसांपासून वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेनंही राज्यभरात सोमवारपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वाढीव वीज बिलाच्या दरात सवलत देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राज्यभरात वीज ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांनी नितीन राऊत यांच्याशी विज बिल सवलतावर चर्चा केली होती. याबद्दल एक आढावा बैठकही नुकतीच पार पडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वीज बिल सवलतीबद्दल काही घोषणा करता का हे पाहण्याचे ठरणार आहे.
    Published by:sachin Salve
    First published: