Home /News /pune /

Maharashtra lockdown मध्ये गरिबांना आर्थिक मदत मिळणार? अजित पवार म्हणाले....

Maharashtra lockdown मध्ये गरिबांना आर्थिक मदत मिळणार? अजित पवार म्हणाले....

'जो काही निर्णय होईल त्याला आमचा पाठिंबा असेल. उद्या काही कठोर निर्णय घेण्याची वेळ आली तर गरीब वर्गाला आर्थिक मदत करण्याची माझीही इच्छा आहे'

    पुणे, 10 एप्रिल : राज्यात कोरोनाची परिस्थितीत बिकट होत चालली आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन ( Maharashtra lockdown ) लागणार हे निश्चित झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात गरिबांचे हाल होऊ नये, त्यांना आर्थिक मदत मदत करण्यासाठी सकारात्मक विचार करत आहे, असे सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसंच, लॉकडाऊनचा निर्णय घ्यावाच लागणार आहे, आमचा पाठिंबा आहे, असंही अजित पवारांनी (Ajit pawar) स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत अजित पवार यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. आज मी पुण्यात बैठक घेऊन चर्चा केली. मुख्यमंत्री आपण आता सर्वांची मत ऐकून योग्य तो निर्णय घ्यावा.पुण्यात आम्ही तयारी केली आहे.  व्हेंटीलेटरची आवश्यकता आहे ती पूर्ण करण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरही मदत करणार आहेत. पुण्यासाठी रुग्णांच्या संख्येपेक्षा आपल्याला ऑक्सिजन जास्त लागत आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली. 'रेमडेसीवीरचा कृत्रिम तुटवडा करण्याचा काही जण प्रयत्नं करत आहेत. हा काळाबाजार रोखण्यासाठी आपण प्रयत्नं केला पाहिजे, पुणेकरांनी आज शनिवारी चांगला प्रतिसाद दिला. लॉकडाऊनला खासगी हॉस्पिटलनेही सहकार्याची भूमिका घेतली आहे, असंही अजित पवारांनी सांगितले. 'जो काही निर्णय होईल त्याला आमचा पाठिंबा असेल. उद्या काही कठोर निर्णय घेण्याची वेळ आली तर गरीब वर्गाला आर्थिक मदत करण्याची माझीही इच्छा आहे. गरीब वर्गासाठी त्यांची संख्या किती याची काही रेकाँर्ड नाही. बांधकाम मजुरांचा रेकॉर्ड आहे. पण सर्वाचा नाही पण आपण प्रयत्न करू, असं आश्वासन अजित पवार यांनी दिले. थोडा वेळ सर्वांना कळ सोसावी लागेल -मुख्यमंत्री तर, कोरोना विषाणूची साखळी तोडायची असेल तर सलग 10 किंवा 21 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. या बैठकीत कडक लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले आहेत. 'जनतेला समजावू शकतो पण करोनाला समजावू शकत नाही'असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. बैठकीच्या शेवटी आपला निर्णय काय... कडक लाँकडाऊन पण आणि जनतेच उद्रेक यामध्ये मार्ग काढावा लागेल. थोडा वेळ सर्वांना कळ सोसावी लागेल. जनतेला समजावू शकतो पण करोनाला समजावू शकत नाही. मी ज्या सर्वांशी चर्चा केली त्यांना सर्वांनी सहकार्य केलं व्यापारी उद्योजक. याला काही अवधी लागेल एक दोन दिवसात व्यापारांचा प्रश्नं सोडवू. नाहीतर सर्व काही सुरू ठेवा आणि जे काही अनर्थ ओढवेल त्याला सामोर जावं लागेल. किमान 15 दिवसांचा लॉकडाऊन करावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, हे जेवढ्या लवकर आपण थोपवू तेवढं आपण आपण हे संक्रमण रोखू शकू. माझं मत आहे की किमान 15 दिवस लॉकडाऊन करावा असं मतं आहे तुम्ही तुमचं मत सांगा. माझं हे म्हणणं नाही की महिना दोन महिना लॉकडाऊन करा, पण आपण हळूहळू एक एक घटक सुरू करू शकतो पण सुरुवात तर करू.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Pune, अजित पवार

    पुढील बातम्या