पंकजा मुंडे सेनेत येणार का? संजय राऊतांचे सूचक विधान

पंकजा मुंडे सेनेत येणार का? संजय राऊतांचे सूचक विधान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख असताना राज्यपालांना भेटणं योग्य नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख न करता टोला लगावला.

  • Share this:

मुंबई, 31 ऑक्टोबर : एकनाथ खडसे  (Eknath khadse) यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर भाजपच्या  नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याबद्दलही शिवसेनेत (Shivsena)प्रवेशाची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. 'पंकजा मुंडे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच ऑफर देऊ शकता' असं सूचक विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी संजय राऊत यांनी आपल्या शैलीत चौफेर फटकेबाजी केली. यावेळी पत्रकारांनी पंकजा मुंडे यांच्या शिवसेनेच्या प्रवेशाच्या चर्चेबद्दल विचारले असता संजय राऊत म्हणाले की, 'पंकजा मुंडे या भाजपच्या चांगल्या नेत्या आहे. त्यांच्याशी चांगले संबंध आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना जर पक्षात घ्यायचे असेल तर त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑफर देतील.'

भावाने घेतला सख्ख्या भावाचा बदला, पत्नीसोबत अवैध संबंध ठेवल्यानं काढला काटा

'सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. पण काही लोकांना वाटत होतं की, हे सरकार 15 दिवसात कोसळेल. पणहे सरकार पूर्ण ताकदीने चाललेलं आहे.  मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लढाई यशस्वीपणे सांभाळली आहे, असं ही राऊत म्हणाले.

'शरद पवार सरकार चालवतात हा आरोप चुकीचा आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहे. ते महाविकास आघाडी सरकारला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. ते वरिष्ठ नेते असल्यामुळे सरकारला सल्ला देतात. आता याबद्दल चंद्रकांत पाटलांनी वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. कदाचित मोदी आजही पवारांचे मार्गदर्शन घेत असतील', असं म्हणत राऊत यांनी सणसणीत टोला लगावला.

तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख असताना राज्यपालांना भेटणं योग्य नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेख न करता टोला लगावला.

या दिवाळीत घ्या बजेटफ्रेंडली स्मार्टफोन: Honor 10X lite लाँच; जाणून घ्या किंमत

'आघाडी सरकारसमोर विरोधी पक्षाकडून आव्हानं निर्माण  केली जात आहेत. केंद्र सरकारला वाटतं विरोधी पक्ष राहूच नये, आमचं मात्र तसं नाही. आम्ही विरोधकांचे नेहमीच स्वागत करतो', असं म्हणत राऊत यांनी भाजपला कोपरखळी लगावली.

' आज बिहारमध्ये तेजस्वी यादव हिंमतीने लढतोय, लाखोंच्या सभा घेतोय. उद्या बिहारमध्ये तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाले तर आश्चर्य वाटणार नाही, असंही राऊत म्हणाले.

Published by: sachin Salve
First published: October 31, 2020, 12:37 PM IST
Tags:

ताज्या बातम्या