मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

भाजप सोडणार का? अखेर मेधा कुलकर्णी यांनी दिले उत्तर

भाजप सोडणार का? अखेर मेधा कुलकर्णी यांनी दिले उत्तर

'आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी विधान परिषदेची उमेदवारी देणार असा शब्द देण्यात आला होता. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांसठी कोथरूडची जागा सोडली होती'

'आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी विधान परिषदेची उमेदवारी देणार असा शब्द देण्यात आला होता. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांसठी कोथरूडची जागा सोडली होती'

'आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी विधान परिषदेची उमेदवारी देणार असा शब्द देण्यात आला होता. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांसठी कोथरूडची जागा सोडली होती'

  • Published by:  sachin Salve

पुणे, 13  नोव्हेंबर : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी (Teacher and Graduate Constituency Elections) सर्वच पक्षाकडून उमेदवार हे मैदानात उतलले आहे. पुण्यातून भाजपकडून (BJP) संग्राम देशमुख (Sangram Deshmukh) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) या नाराज असल्याची चर्चा होती. परंतु, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळीच मला विधान परिषदेची उमेदवारी देणार असा शब्द देण्यात आला होता, असा खुलासा मेधा कुलकर्णी यांनी केला आहे.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे सर्वच पक्षात नाराजीचे सूर उमटले आहे. पुण्यात सुद्धा कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या ऐवजी सांगलीचे संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मेधा कुलकर्णी नाराज असून पक्ष सोडतील अशी चर्चा रंगली होती. परंतु, दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, मेधा कुलकर्णी यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.

बच्चू कडूंची यंदाची दिवाळी खास! वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांना घातलं अभ्यंगस्नान...

'आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी विधान परिषदेची उमेदवारी देणार असा शब्द देण्यात आला होता. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांसठी कोथरूडची जागा सोडली होती, मुळात तो पक्षाचा आदेश होता, तो मानला होता. पक्षासोबत माझी निष्ठा कायम आहे. कोथरूड हे माझं माहेर घर आहे, त्यामुळे याच मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवणे यापेक्षा दुसरा आनंद नाही. यंदा तर संधी हुकली पण पुढच्या निवडणुकीत कोथरूडमधूनच विधानसभा लढवणार', अशी इच्छा मेधा कुलकर्णी यांनी बोलून दाखवली.

तसंच, मी पक्षावर नाराज नाही. माझ्याबद्दल अनेक जण मुद्दाम बातम्या पसरवत असतात. मला इतर पक्षाकडून सुद्धा तिकीटं देण्याचे प्रयत्न केले जात आहे. पण, मी पक्ष सोडणार नाही. त्यामुळे असा खोडसाळपणा जर कुणी करत असेल तर त्यांनी तो थांबवला पाहिजे, मी कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नाही, भाजपने जो पदवीधरसाठी उमेदवार दिला आहे, त्याचे प्रामाणिकपणे काम करणार आहे, असंही मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

चिरंजीवीला कोरोनाने चकवलं! 3 दिवसांत रिपोर्ट आला Covid Negative, चाचणीच होती चुक

'मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा अशीच चर्चा रंगली होती. पण मी त्यावेळीही पक्ष सोडला नाही आणि भविष्यातही तसा विचार करणार नाही. एखाद्या व्यक्तीला कामापासून दूर ठेवणे त्यातून अशी भावना निर्माण होते. त्यामुळे कामाची जबाबदारी दिली पाहिजे, मला जर चीनच्या सीमेवर पाठवलं तर मी तिथे सुद्धा जाईल', असंही कुलकर्णी म्हणाल्या.

'मी पक्षावर मुळीच नाराज नाही. केंद्र सरकार अतिशय उत्तमपणे काम करत आहे. गेल्या 60 वर्षांत जे निर्णय घेता आले नाही, ते निर्णय मोदी सरकारने घेतले आहे. माझी कुणाबद्दल नाराजी असू शकते. त्याबद्दल मी पक्षाअंतर्गत मतं माडेल, पण मी कायमस्वरुपी भाजपात आहे. संघाच्या विचारसरणीत लहानाची मोठी झाले, त्यामुळे पक्ष सोडून जाणार नाही, पक्ष माझ्या गुणांची दखल घेईल याची खात्री आहे', असा विश्वासही मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

First published: