पुण्यात पत्नीच्या डोक्यात हातोडा घातला, नंतर केली आत्महत्या आणि व्यक्त केली 'ही' अंतिम इच्छा

पुण्यात पत्नीच्या डोक्यात हातोडा घातला, नंतर केली आत्महत्या आणि व्यक्त केली 'ही' अंतिम इच्छा

'सोसायटीतल्या व्यक्तींनी गणेशोत्सव नेहमीसारखा साजरा करावा. एकही कार्यक्रम रद्द करू नये', हीच अंतिम इच्छा असल्याचं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 28 ऑगस्ट: पिंपरीजवळ रावेत येथे पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून तिची निर्घृण हत्या केल्याची आणि नंतर आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका मोठ्या सोसायटीत फ्लॅटमध्ये ही घटना घडली. सकाळी कुणी दरवाजा उघडत नाही, हे शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना बोलावलं आणि पती-पत्नी मृतावस्थेत दिसले. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. वृषाली गणेश लाटे आणि गणेश ऊर्फ संजय चंद्रकांत लाटे (रा. आदित्य टेरेस, शिंदे वस्ती, रावेत) असं मृत दाम्पत्याचे नाव आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. पण त्यानंतर पोलिसांना संजय लाटेंनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली.

वरीष्ठ निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे चारच्या सुमारास गणेश यांनी आपल्या पत्नीचा हातोडी डोक्यात घालून निर्घृण हत्या केली. त्यानंतर स्वतःही आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांपासून वृषाली या आजारी होत्या. आजारपणात त्यांना होणाऱ्या यातना सहन न झाल्याने त्यांचा खून करून आपण आत्महत्या करीत असल्याचे गणेश यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. याबाबत अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

संजय लाटे हे एका नामांकित कंपनीत नोकरीला होते. पत्नी वृषाली आजारी होत्या आणि त्यांना खूप वेदना होत असतं. या वेदना बघवत नाहीत म्हणून टोकाचा निर्णय घेत आहे, अशा अर्थाची चिठ्ठी संजय लाटे यांनी लिहून ठेवली. त्यांनी मध्यरात्री वृषालीच्या डोक्यात हातोडा मारून त्यांना ठार केलं आणि नंतर आत्महत्या केली.

हे वाचा - देव तारी त्याला कोण मारी; 25 फुटावरून कार कोसळली पण...

आत्महत्येपूर्वी संजय यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, 'वृषालीची अवस्था बघवत नाही. आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे टोकाचा निर्णय घेत आहे. सोबत तिला घेऊन जात आहे. पण सोसायटीतल्या व्यक्तींनी गणेशोत्सव नेहमीसारखा साजरा करावा. एकही कार्यक्रम रद्द करू नये. हीच अंतिम इच्छा आहे.'

पुणं हादरलं; फुटपाथवर झोपणाऱ्या 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

संपूर्ण महाराष्ट्राताल हादरवून सोडणारी घटना पुण्यात घडली आहे. फुटपाथवर झोपणाऱ्या एका 3 वर्षीय मुलीला उचलून नेण्यात आले आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतर पीडीत मुलीची हत्या करण्यात आली. या संपूर्ण घटनेने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पाहा VIDEO - खेकडे पकडायले गेले अन् समोर आली भली मोठी मगर, पाहा हा VIDEO

मालधक्का चौकातून मंगळवारी पहाटे फुटपाथवर झोपणाऱ्या एका 3 वर्षाच्या मुलीला उचलून नेण्यात आले आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतर मुलीचे डोक आपटून खून करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यार्डात थांबलेल्या रेल्वेच्या डब्यात मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि तेथेच डोक आपटून तिची हत्या करण्यात आली. ही घटना उघडकीस आल्यानंतर पीडीत मुलीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यासंदर्भात रेल्वे पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. संबंधित मुलीवर कोणी अत्याचार केला किंवा ते किती जण होते याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

गुंडांचा त्रास, अखेर दाम्पत्याने घेतले पेटवून; अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO

Published by: Sandip Parolekar
First published: August 28, 2019, 6:00 PM IST

ताज्या बातम्या