पुण्यात वयोवृद्ध महिलेचा खून, आजाराला कंटाळून पतीनेच केले 'हे' कृत्य

पुण्यात वयोवृद्ध महिलेचा खून, आजाराला कंटाळून पतीनेच केले 'हे' कृत्य

वानवडीत परिसरात वृद्ध पत्नीचा खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. आजाराला कंटाळून पतीनेच पत्नीचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वानवडी पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.

  • Share this:

पुणे, 2 ऑगस्ट- वानवडीत परिसरात वृद्ध पत्नीचा खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. आजाराला कंटाळून पतीनेच पत्नीचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वानवडी पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. दविंद्र कौर बिंदा (वय- 66) असं खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पती हरविंदर (वय-77) फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेचे नेमके कारण समजू शकले नाही.

सविस्तर वृत्त लवकरच...

पुण्यात जुन्या वाड्याची भिंत कोसळली, मायलेक थोडक्यात बचावले

पुण्यातील गणेश पेठेत ढोर गल्लीत बोरा हॉस्पिटलजवळ मध्यरात्री जुन्या वाड्याची भिंत कोसळली. भिंत पडत असल्याचे वेळीच लक्षात येताच दुदैवाने मायलेकाचा जीव थोडक्यात बचावला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. शहरात काही भागात धोकादायक वाडे आहेत. बहुतांश वाड्यांच्या भिंती जीर्ण झाल्या आहेत. धक्कादायक म्हणजे त्यात लोक राहत आहेत.

 

SPECIAL REPORT: पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहाचा प्रवेश सोपा नाही, 'हे' आहेत कठोर नियम

Published by: Sandip Parolekar
First published: August 2, 2019, 12:40 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading