Home /News /pune /

पतीच्या मृत्यूनंतर 3 तासातच पत्नीनंही सोडले प्राण; पुण्यातील हृदय पिळवटून टाकणारी घटना

पतीच्या मृत्यूनंतर 3 तासातच पत्नीनंही सोडले प्राण; पुण्यातील हृदय पिळवटून टाकणारी घटना

Representative Image

Representative Image

पुण्यातील शिरूर याठिकाणी एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्यानंतर (Husband death by Heart attack) अवघ्या तीन तासांत पत्नीनंही आपला देहत्याग (Wife death) केला आहे. या हृदयद्रावक घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुढे वाचा ...
    पुणे, 26 एप्रिल: सध्या महाराष्ट्रासह देशात कोरोना विषाणूमुळे अनेकांचे मृत्यू होत आहेत. त्यामुळे सर्वत्र एक नैराश्याचं वातावरण तयार झालं आहे. अशातचं अनेक कुटुंब परकी झाली आहेत, तर अनेकांनी आपल्या जीवाभावाच्या माणसांना गमावलं आहे. अशातच पुण्यातील शिरूर येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्यानंतर (Husband death by Heart attack) अवघ्या तीन तासात पत्नीनंही आपला देहत्याग (Wife death) केला आहे. अवघ्या तीन तासाच्या अंतराने डोक्यावरील छत्र हरपल्यानं संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संबंधित घटना ही पुणे जिल्ह्यातील शिरूर जवळील इनामगावात घडली आहे. येथील 87 वर्षीय शेतकरी किसन भालेराव नेहमीप्रमाणे बैलगाडी जुंपत होते. दरम्यान त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे घरच्यांना काही कळायच्या आतच जागीच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांच्यावर गावातील स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात आले. हे ही वाचा- कोरोनाबाधित आईला मुलानं घराबाहेर काढलं; मुलीनंही हकललं, रस्त्यावरच मृत्यू अंत्यसंस्कार झाल्यानंतर सर्व नातेवाईक आणि कुटुंबीय परत घरी परतले. अजूनही सर्व नातेवाईक आणि कुटुंबीय शोक व्यक्त करत होते. घरातील सदस्यांचे अश्रूही पुसले नाहीत. तोपर्यंत भालेराव कुटुंबीयावर काळाने दुहेरी हल्ला केला. पतीच्या निधनानंतर विरह सहन न झाल्याने पत्नीचाही मृत्यू झाला आहे. यामुळे अवघ्या तीन तासांच्या अंतराने मायेचं छत्र हरवल्याने इनामगावातील भालेराव कुटुंब पोरकं झालं आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Death, Pune, Wife and husband

    पुढील बातम्या