'स्त्री-पुरुष असा भेद कशाला?' पुण्यात महिला रचतायेत चितेसाठी सरण

'स्त्री-पुरुष असा भेद कशाला?' पुण्यात महिला रचतायेत चितेसाठी सरण

कुठं स्मशानभूमी धगधगत आहे, तर कुठं नदीतून मृतदेह वाहत आहेत. हे असं विदारक चित्र जरी असलं तरी एक गोष्ट खरी की, कोरोना बाधित रुग्णांना अंतिम निरोप द्यायला समाजाच्या विविध स्तरातील तरुणाई स्वयं प्रेरणेने पुढं येत आहे.

  • Share this:

पुणे, 15 मे : कोरोना काळात सध्या सर्वच ठिकाणी चर्चा आहे ती मृतदेहांची. कुठं स्मशानभूमी धगधगत आहे, तर कुठं नदीतून मृतदेह वाहत आहेत. हे असं विदारक चित्र जरी असलं तरी एक गोष्ट खरी की, कोरोना बाधित रुग्णांना अंतिम निरोप द्यायला समाजाच्या विविध स्तरातील तरुणाई स्वयं प्रेरणेने पुढं येत आहे. कोरोना बाबतचे नियम पाळून ही तरुणाई कोरोना बाधित मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार करीत आहे.

पुण्यात स्वरूप वर्धिनी, सेवा सहयोग आणि सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प यांच्या मार्फत रोज 6 तास समाजासाठी हा उपक्रम वैकुंठ स्मशानभूमीत राबवला जात आहे आणि याचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे प्रथा, परंपरा, संकेत झुगारून तरुणी, महिला यात सहभागी झाल्या आहे.

कोरोनामुळे जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर नियम आणि बंधनामुळे आपल्या लाडक्या व्यक्तीला भडाग्नीही देता येत नाही किंवा अनेकांना अंत्य संस्काराला हजरही राहता येत नाहीय. अशा कठीण काळात सरकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीला या पुढे आल्या आहेत. समाजाच्या विविध स्तरातील तरुणांनी धर्म, जात न पाहता हे अंत्यसंस्कार केल्याचं चित्र राज्यभर, देशभर दिसलं. आता यात तरुणी आणि महिलाही सहभागी होताना दिसत आहेत.

पुण्यातील स्वरूप वर्धिनी, सेवा सहयोग आणि सुराज्य सर्वांगीण विकास संस्था या 3 संस्थांनी 6 तास समाजासाठी या सुरू केलेल्या उपक्रमात तरुण तरुणी सहभागी झालेत. गेले महिनाभर सर्व शिफ्टमध्ये गटागटाने हे सर्व जण काम करीत आहेत. कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून उपक्रमाचे आयोजक सेवा सहयोग संस्थेचे विनीत कोंडजकर यांनी महिनाभर तरुण तरुणी पूर्ण दिवस सर्व शिफ्टमध्ये अथक काम करत आहेत. सामाजिक संकेत, प्रथा, परंपरा झुगारून तरुणी, महिला सहभागी होतायत याकडं लक्ष वेधलं. कोरोना बाबत सर्व नियम पाळून अथकपणे काम सुरूय असं विनीत यांनी सांगितलं.

हे ही वाचा-पुण्यात मुस्लीम बांधवांचा नवा आदर्श,ईदच्या दिवशीही कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार

या उपक्रमात सहभागी झालेल्या तरुणींनी सस्मशानभूमीत महिलांनी जाऊ नये, त्यांचं काय काम असं संस्कृतीत नाही,प्रथा-परंपरा नाही हे संकेत,आक्षेप झुगारून देत चितेवर सरण रचणे, भडाग्नी देणे! अंत्यसंस्काराच्या दुसऱ्या दिवशी राख आणि अस्थी देणे, मंत्रपठण करणे ही सगळी कामे केली. पूजा कुलकर्णी यांनी सांगितलं की अंत्यसंस्कार, स्मशानभूमी म्हटलं की आपल्याकडे स्त्रियांना या गोष्टी वर्ज्य. महिलांनी अशा ठिकाणी जाऊ नये अशा विचारांचा पगडा असतो. मात्र वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला, कॉलेज मधील तरुणी सहभागी झाल्या आहेत.

प्रणिता आणि निधी यांनी सांगितलं की, पहिल्यांदाच अशा उपक्रमात सहभागी होतोय. कोरोनामुळे परिजन गमावले आहेत, अशांना थोडाफार हातभार लावतोय. खूप कठीण काळ आहे. मात्र अशा वेळी स्त्री, पुरुष असा भेद कशाला..मदत करणं महत्वाचं. यशोधरा यांनीही मी डॉक्टर नाही उपचार करू शकत नाही मात्र  जे नातेवाईक पॉझिटिव्ह आहेत जवळ येऊ शकत नाहीत,अंत्यसंस्कार करू शकत नाहीत मात्र आम्ही चितेवर सरण ठेवणं, भडाग्नी देणे, मंत्रोच्चार करणे,दुसऱ्या दिवशी अस्थी देणे ही कामे करतोय . महिलांनी का अशी कामे करावीत हे आक्षेप झुगारून..कारण वेळच तशी आहे.सेवाभावी वृत्तीने समाजबांधवांसाठी सर्वांनी पुढं आलं पाहिजे हा विचार करून मी माझा नवरा, मुलगी सर्व कुटुंब सहभागी झालो असं यशोधरा म्हणाल्या..

कोरोनामुळे आपल्या लाडक्या परिजनांना अखेरचा निरोप देणं दुरापास्त झालंय, संसर्गाच्या भीतीनं दुरूनच अंत्यदर्शन घ्यावे लागतंय मात्र किमान सेवाभावी कार्यकर्त्यांमुळे सन्मानाने निरोप देता येतोय हे मात्र निश्चित....

Published by: Meenal Gangurde
First published: May 15, 2021, 6:53 PM IST

ताज्या बातम्या