मराठी बातम्या /बातम्या /पुणे /चिंचवडमध्ये राष्ट्रवादीलाच का मिळाली उमेदवारी? काय होतं महाविकास आघाडीचं गणित?

चिंचवडमध्ये राष्ट्रवादीलाच का मिळाली उमेदवारी? काय होतं महाविकास आघाडीचं गणित?

चिंचवड रणधुमाळी २०२३

चिंचवड रणधुमाळी २०२३

महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीला चिंचवडची उमेदवारी मिळाली, यामागे महाविकास आघाडीचे गणित काय होते?

पुणे, 3 मार्च : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला. यामध्ये कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांचा विजय झाला. रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने तर अश्विनी जगताप यांनी राष्ट्रवादीच्या नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंना पराभूत केले.

दरम्यान, चिंचवड विधानसभेच्या या पोटनिवडणुकीत भाजपच्या विजयानंतर असे दिसून आले की, भाजपच्या या विजयात अपक्ष उमेदवार राहुल कलाटे गेमचेंजर ठरले. कारण राहुल कलाटे यांनी चिंचवडमध्ये 44 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य घेतले.

राष्ट्रवादी इथे उमेदवार का दिला -

दरम्यान, अजित पवारांनी चिंचवडमध्ये नाना काटेंना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीने भाजपच्या विरोधात इथे आपला उमेदवार दिला. मात्र, दुसरीकडे राज्यात शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर त्याठिकाणी शिवसेना उमेदवाराला सहानुभूती मिळेल, अशी शक्यता होती. मात्र, चिंचवड परिसरात राष्ट्रवादीचे चांगले वर्चस्व आहे असे मानले जाते. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये इथे राष्ट्रवादीने उमेदवार दिला. मात्र, ही जागा राष्ट्रवादीला मिळाली म्हणून शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. त्यांना अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांनी संपर्क करत माघार घेण्याबाबत चर्चा केली. मात्र, तरी त्यांनी शेवटपर्यंत माघार घेतली नाही आणि ही निवडणूक लढवली.

फडणवीसांचा आरोप -

दरम्यान, राहुल कलाटेंमुळे चिंचवडमध्ये भाजपचा विजय झाला, असे अजित पवारांसह महाविकास आघाडीचे नेते म्हणाले आहे. यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. राहुल कलाटे हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.

राहुल कलाटे उभे राहिल्यामुळे भाजपचा विजय झाला, असा भ्रम काही जण पसरवत आहेत, पण हे सत्य नाही. 2019 ला पहिल्यांदा हा प्रयोग करण्यात आला. राहुल कलाटेंना सर्व पक्षांनी पाठिंबा देऊन स्वतंत्र उमेदवार म्हणून उभं केलं. पण ते 38 हजारांच्या फरकाने हरले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तिकीटावर त्यांना उभं केलं तर जी शिवसेनेची हिंदुत्ववादी मतं आहेत ही सरळ भाजपकडे जातील, म्हणून त्यांना अपक्ष उभं केलं होतं'.

यानंतर 'यावेळीही राहुल कलाटे उभे राहिले, त्यामागेही हेच डिझाईन होतं. ते जर उभे राहिले नाहीत तर हिंदुत्ववादी मतं शिवसेनेकडे जातात ती सगळी मतं भाजपकडे जातील, म्हणून त्यांना उभं करण्यात आलं आणि त्यांनी मतं घेतली. ती सगळी मतं महाविकासआघाडीला गेली नसती. ते उभे राहिले नसते तर 60-65 टक्के मतं भाजपला मिळाली असती. ही राष्ट्रवादी काँग्रेसची स्ट्रॅटजी होती, त्यातूनच त्यांनी कलाटेंना उभं केलं', असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

First published:
top videos

    Tags: Ajit pawar, BJP, Devendra Fadnavis, Election, Maharashtra politics, Mahavikas Aghadi