पुण्यात अजूनही का वाढत आहेत कोरोना रुग्ण? महापालिकेनं सांगितली 2 महत्त्वाची कारणे

पुण्यात अजूनही का वाढत आहेत कोरोना रुग्ण? महापालिकेनं सांगितली 2 महत्त्वाची कारणे

पुण्याच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पुण्यातील कोरोनाची सद्यस्थिती आणि वाढीची कारणे यावर भाष्य केलं आहे.

  • Share this:

पुणे, 31 मे : महाराष्ट्रासह देश लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याच्या जवळ पोहोचला तरीही विविध भागातील कोरोनाबाधितांची संख्या अजूनही वाढत आहे. पुणे शहरातील दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पुण्यातील कोरोनाची सद्यस्थिती आणि वाढीची कारणे यावर भाष्य केलं आहे.

'आधी अ‍ॅक्टिव्ह कोव्हिड-19 रुग्णांची संख्या 5000 पेक्षा जास्त होती. मात्र साडेतीन हजारहून अधिक व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 2000 पर्यंत घटली. भवानी पेठसारख्या कोरोनाच्या हॉटस्पॉटमधील रुग्णसंख्या कमी करण्यात आपल्याला यश आलं आहे. रुग्ण आढळलेल्या परिसरात वेगाने तपासणी केली जात आहे. पुण्यातील 80 टक्के केसेस लक्षण नसलेल्या आहेत. शहरातील मृत्यूदर घटला आहे,' असं अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी म्हटलं आहे.

का वाढत आहेत कोरोना रुग्ण?

'एकूण शहराचा विचार करता पॉझिटिव्ह रुग्ण वाढतच आहेत. त्यामागील कारणं म्हणजे आपण कोरोना चाचण्या वाढवल्या आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या जास्त दिसत आहे. कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याचं दुसरं कारण म्हणजे नव्या रुग्णांमध्ये तरुण अधिक आहेत. काही लोक प्रतिबंधित क्षेत्राबाहेर पडताना दिसतात, काही संध्याकाळी सोसायटीत खेळताना दिसतात. आपण सोशल डिस्टन्सिंग किंवा नियमावलीचं पालन काटेकोरपणे केलं पाहिजे,' असं आवाहन रुबल अग्रवाल यांनी केलं आहे.

तब्बल 50 दिवसांनंतर पुण्याचं मार्केटयार्ड पुन्हा सुरू

अनेक दिवसांच्या कडक निर्बंधांनंतर आता अखेर पुण्याचं मार्केटयार्ड पुन्हा सुरू झालं आहे. सोशल डिस्टेंस पाळण्यासाठी रोज क्षमतेच्या पन्नास टक्केच बाजार भरणार आहे. एका आडत्याला फक्त एकच गाडी आत आणता येईल. मार्केट यार्डातूनच पुणे शहराला भाजीपुरवठा होतो.

संकलन, संपादन - अक्षय शितोळे

First published: May 31, 2020, 6:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading