पुणे, 31 ऑगस्ट : नवरा आणि बायकोमध्ये (wife and husband) वाद होणे ही नवी बाब नाही. पण, मला न विचारला पाणीपुरी (Panipuri) का आणली म्हणून एका दाम्पत्यामध्ये वाद झाला आणि त्यानंतर रागाच्या भरात पत्नीने विष (poison) पिऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी मृत महिलेल्या पतीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा सरवदे असं आत्महत्या केलेल्या महिलंच नाव आहे. तर गहिनीनाथ सरवदे असं तिच्या पतीचे नाव आहे. त्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे, असं वृत्त दैनिक लोकमतने दिलं आहे.
सरवदे हा मुळचा सोलापूर येथील रहिवासी आहे. लग्न दोन वर्षांपूर्वी त्यांचं प्रतीक्ष यांच्यासोबत लग्न झालं. गहिनाथ हा उच्चशिक्षित तरुण आहे. त्यांना एक मुलगा आहे. पुण्यात तो एका मोठ्या कंपनीत कार्यरत आहे. पुण्यात राहण्यासाठी आल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू होता. रोज घरात कुरुबुरी वाढल्या होत्या. दोघेही आंबेगाव पठार परिसरात राहत होते.
ऑफिसवरून घरी येत असताना गहिनीनाथ याने पाणीपुरी पार्सल आणली होती. घरी पाणीपुरी आणल्यानंतर प्रतीक्षा आणि त्याच्यात पुन्हा वाद झाला. मला न विचारला पाणीपुरी का आणली असा जाब प्रतीक्षाने विचारला. त्यामुळे दोघांमध्ये भांडण झालं. त्यामुळे प्रतीक्षाने पाणीपुरी खाण्यास नकार दिला. रात्री झालेल्या भांडणानंतर दुसऱ्या दिवशी गहिनीनाथ याने डबा नेण्यास नकार दिला. त्यामुळे प्रतीक्षाला राग आला. त्यामुळे तिने रागाच्या भरात घरात असलेले विषारी औषध प्राशन केलं. प्रतीक्षा घरात बेशुद्ध पडल्यानंतर तिला तातडीने शेजारच्या लोकांनी रुग्णालयात दाखल केलं.
सौदी अरेबियाच्या विमानतळावर ड्रोन हल्ला, 8 जण गंभीर जखमी
रुग्णालयात उपचार सुरू असताना प्रतीक्षाचा मृत्यू झाला. आपल्या मुलीचा मृत्यू झाल्यामुळे तिच्या वडिलांनी गहिनीनाथवर संताप व्यक्त केला. त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गहिनीनाथ याला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पुणे पोलीस करत आहे.
मात्र, अगदी क्षुल्लक कारणावरून प्रतीक्षाने टोकाचं पाऊल उचलल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, Pune news, Woman suicide