मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

टीव्ही का चालू ठेवला, एका कारणावरून पतीने पत्नीचा आवळला गळा, 6 महिन्याची मुलगी झाली पोरकी!

टीव्ही का चालू ठेवला, एका कारणावरून पतीने पत्नीचा आवळला गळा, 6 महिन्याची मुलगी झाली पोरकी!

नराधम पतीने आपल्या सहा महिन्यांच्या चिमुकलीचा विचार न करता पत्नीचा गळा दाबून खून केला.

नराधम पतीने आपल्या सहा महिन्यांच्या चिमुकलीचा विचार न करता पत्नीचा गळा दाबून खून केला.

नराधम पतीने आपल्या सहा महिन्यांच्या चिमुकलीचा विचार न करता पत्नीचा गळा दाबून खून केला.

  • Published by:  sachin Salve

गणेश दुडम, प्रतिनिधी

मावळ, 28 ऑगस्ट : संसार म्हटलं की भांड्याला भांडे लागणारच. त्यामुळे नवरा-बायकोमध्ये भांडणं होणे ही नवी बाब नाही. पण, अगदी क्षुल्लक कारणावरून सहा महिन्यांच्या बाळंतीण पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना पुणे (pune) जिल्ह्यातील मावळमध्ये (maval) घडली आहे. टीव्ही  (tv)चालू का ठेवला, या एका कारणावरून निर्दयी पतीने पत्नीची हत्या केली आहे. त्याच्या या कृत्यामुळे सहा महिन्यांच्या मुलीच्या अंगावर आईचे छत्र हरपले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील चांदखेड इथंही घटना गडली आहे.  चांगुणा योगेश जाधव (वय 20 वर्ष) असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. पती योगेश हा चांगुणाला बाळंतपणात पहिली मुलगी का जन्माला घातली म्हणून तिचा छळ करत होता.

फडणवीस म्हणाले हे तीन चाकी सरकार अन् अजितदादांनी रिक्षा चालवून दाखवला, VIDEO

दोघांमध्ये यावरून रोज वाद होत होता. परंतु, निमित्त झाले टीव्हीचे. रात्रभर टीव्ही सुरू राहिल्याने दोघांत वाद झाला,आणि त्याचे पर्यावसन तिच्या मृत्यूत झाले. नराधम पतीने आपल्या सहा महिन्यांच्या चिमुकलीचा विचार न करता पत्नीचा गळा दाबून खून  केला. आरोपी पतीला योगेश जाधवला शिरगाव परंदवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Sports Authority Of India Recruitment: 'या' पदासाठीच्या तब्बल 220 जागांसाठी भरती

आरोपी पती योगेश जाधव हा मोलमजुरी करून उदरनिर्वाह करायचा. परंतु तो गेल्या काही महिन्यांपासून विचित्र वागत असल्याने मयत पत्नी आपल्या चिमुकलीला घेऊन माहेरी गेली होती. खुनाच्या आदल्या दिवशी ती नवऱ्याकडे नांदायला आली होती आणि त्यात ही दुर्दैवी घटना घडली. दोघांचे कडाक्याचे भांडण झाले आणि रागाच्या भरात योगेशने पत्नीची हत्या केली. या घटनेने चांदखेड गावातील ग्रामस्थांनी  हळहळ व्यक्त केली.

First published: