Home /News /pune /

कोरोनाशी लढा देण्यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकारपदी कोण येणार? 3 अधिकाऱ्यांची नावं चर्चेत

कोरोनाशी लढा देण्यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकारपदी कोण येणार? 3 अधिकाऱ्यांची नावं चर्चेत

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देऊन अवघ्या दहा दिवसात ससुनची नवीन इमारत कोरोना स्पेशल हॉस्पिटल म्हणून कार्यान्वित करून घेतली होती.

    पुणे, 10 ऑगस्ट : पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात बदल करण्यात आल्यानंतर आता पुण्याचे नवे जिल्हाधिकारी कोण होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. सध्या नवल किशोर राम यांच्याजागी विभागीय आयुक्त सौरभ राव आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे कारभार सांभाळत आहेत. जिल्हाधिकारीपदासाठी 3 नावं सध्या चर्चेत आहेत. राज्यात कोरोनाचा कहर सर्वाधित आहे. त्यातही मुंबई, ठाणे, पुणे येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यावर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर एका चांगल्या अधिकाऱ्याला नियुक्त करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. हे वाचा-क्वारंटाइन व्हा आणि परीक्षा द्या! पुण्यातील 150 विद्यार्थ्यांना कॉलेजचा आदेश चर्चेत असलेल्या तीन नावांपैकी पहिलं नाव हाफकिन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आणि यवतमाळचे माजी जिल्हाधिकारी राजेश देशमुख याचं असून दुसरं नाव लातूरचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांचं नाव घेतलं जात आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश म्हसे हे तिसरं नाव आहे. त्याशिवाय आस्तिक कुमार पांडे यांचेही नाव पुण्याच्या जिल्हाधिकारी पदासाठी चर्चेत आहे. इंडियन एक्सप्रेसने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. हे वाचा-उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढणार, सरकारविरोधात होणार मराठ्यांचा एल्गार पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम (Naval Kishor Ram) यांची थेट पंतप्रधान कार्यालयात (Prime Minister Office) प्रतिनियुक्तीवर बदली झाली आहे. गेली साडेचार महिने ते कोरोनाच्या महामारीत जिल्हा प्रशासनाचा गाडा यशस्वीपणे सांभाळत होते. खासकरून लॉकडाऊन सुरू असतानाही ससून रूग्णालयाची नवीन बिल्डिंग कोरोना आयसीयू स्पेशल वार्ड म्हणून कार्यान्वित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातून थेट पंतप्रधान कार्यालयात जाणारे नवल किशोर राम हे तिसरे अधिकारी आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या