जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / OBC : भुजबळ गेले आता राष्ट्रवादीचा ओबीसी चेहरा कोण? पवार या 2 नावांपैकी कुणाला देणार संधी?

OBC : भुजबळ गेले आता राष्ट्रवादीचा ओबीसी चेहरा कोण? पवार या 2 नावांपैकी कुणाला देणार संधी?

राष्ट्रवादीचा ओबीसी चेहरा कोण

राष्ट्रवादीचा ओबीसी चेहरा कोण

Maharashtra Politics : अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांच्या सारखे ओबीसी चेहरे गेल्याने शरद पवार यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 8 जुलै : अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह सत्तेत सहभागी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. यामध्ये शरद पवार यांचे विश्वासू मानले जाणाऱ्या नेत्यांनीही साथ सोडल्याने मोठा धक्का बसला आहे. धक्कादायक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे हे पक्षातील ओबीसी चेहरे शरद पवारांना सोडून गेलेत. त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादीचा ओबीसी चेहरा म्हणून डॉ. अमोल कोल्हे यांना पुढे आणणार की एकनाथ खडसे यांना प्रोजेक्ट करणार हेच पाहायचं आहे. पवारांचा ओबीसू चेहरा कोणता? अमोल कोल्हे की एकनाथ खडसे? पक्षाचा आश्वासक चेहका कोण? तर शरद पवार… अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी दिलेलं दिलखुलास उत्तर सोशल मीडियावर चांगलंच ट्रेंड झालं होतं. पण आपण कितीही नाही म्हटलं तर भारतीय राजकारणातलं जात वास्तव कोणीच नाकारू शकलेलं नाही. कदाचित म्हणूनच शरद पवारांनीही आपल्या पक्षात ठरवून काही ओबीसी चेहरे पुढे आणले होते. भुजबळांना तर पवारांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत ओबीसी म्हणून प्रोजेक्ट केलं होतं. पण आता पक्षाचे तेच ओबीसी चेहरे पवारांना सोडून गेलेत. वाचा - अजितदादा गटाचे मंत्री धर्मरावबाब आत्राम यांचे थेट शरद पवार यांना आव्हान; म्हणाले.. भुजबळ, मुंडे, तटकरे शरद पवारांना सोडून गेले असले तरी छत्रपती संभाजी मालिका फेम डॉ. अमोल कोल्हे, एकनाथ खडसे, अनिल देशमुख यांच्यासारखे ओबीसी नेते आमच्याकडे आहेतच की, अशी माहिती अकुंश काकडे यांनी दिली. तर भुजबळ, मुंडे, तटकरे यांच्यासारख्या ओबीसी नेत्यांचा आम्हाला निश्चितच फायदा होणार असल्याचे अजितदादा गटाचे प्रवक्ते प्रदीप देशमुख सांगतात.

News18लोकमत
News18लोकमत

भाजपात एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे या दोन प्रमुख ओबीसी चेहऱ्यांचं राजकीय खच्चीकरण झाल्यानंतर नाराज झालेला ओबीसी मतदार हा बऱ्यापैकी  पवारांच्या राष्ट्रवादीकडे आकर्षित झाला होता. दुसरीकडे पवारांनी ठरवून भुजबळ, धनंजय मुंडेंसारखे ओबीसी चेहरे प्रोजेक्ट केले होते. पण आता तेच ओबीसी चेहरे अजितदादा गटात गेल्याने शरद पवारांना पुन्हा नवं ओबीसी नेतृत्व पुढे आणावं लागणार आहे. त्यातूनच मग खडसे किंवा अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाला अधिकचा वाव दिला जाऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात