मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

भारतात सर्वात आधी कुणाला मिळणार कोरोना लस? पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर पूनावालांची माहिती

भारतात सर्वात आधी कुणाला मिळणार कोरोना लस? पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर पूनावालांची माहिती

अंतिम निर्णय आरोग्य मंत्रालयासोबत चर्चेनंतरच होईल,

अंतिम निर्णय आरोग्य मंत्रालयासोबत चर्चेनंतरच होईल,

अंतिम निर्णय आरोग्य मंत्रालयासोबत चर्चेनंतरच होईल,

  • Published by:  Sandip Parolekar

पुणे, 28 नोव्हेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी पुण्याती सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन कोरोना लस निर्मितीसह उत्पादनाबाबत माहिती जाणून घेतली. त्यामुळे कोरोना लस (Corona vaccine) लवकरच मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोरोना लसचं वितरण सर्वात आधी भारतात करणार असल्याचा मोठा खुलासा सीरमचे संचालक आदर पूनावाला (Adar Poonawalla)यांनी पत्रकार परिषदेत केला. विशेष म्हणजे भारतात सर्वात आधी कोरोना लस कुणाला मिळणार? याबाबतही आदर पूनावाला यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आपत्कालीन वितरणाची मंजुरी मिळाल्यानंतरच पुरवठा करणे शक्य होणार आहे. अंतिम निर्णय आरोग्य मंत्रालयासोबत चर्चेनंतरच होईल, असंही पुनावाला यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हेही वाचा...कोरोना लस लवकरच! पंतप्रधान मोदींचं 'मिशन व्हॅक्सिन', पुण्यात लस निर्मितीची पाहणी

आदर पूनावाला यांनी सांगितलं की, भारतात सर्वात आधी 18 वर्षांवरील नागरिकांसाठी लस उपलब्ध करून देण्यात येईल. नंतर त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी पुढील टप्प्यात लसीची निर्मिती करण्यात येईल. लसीच्या पुरवठा तसेच साठवण्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा सीरमकडे उपलब्ध असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

लसीची 60 टक्क्यांपर्यंत परिणामकारकता दिसून आली असल्यानं ती उत्तम आहे. चाचणीत एकालाही रुग्णालयात जावं लागलं नाही, हे सगळ्यात महत्वाचं असल्याचं आदर पूनावाला यांनी यावेळी नमूद केलं. यावेळी पुनावाला यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना देखील उत्तर दिली.

जुलै 2021 पर्यंत 30 कोटी लसींचं लक्ष्य 

पंतप्रधान मोंदीसोबत कोरोना लसीवर सखोल चर्चा झाली. लसीकरणाच्या अंमलबजावणी, लसींच्या साठवणूक तसेच सीमरमधील सुविधांचा पंतप्रधानांनी आढावा घेतला. मात्र, लसीच्या किंमतीवर चर्चा झाली नाही. लसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच दर ठरवता येतील, असंही पूनावाला यांनी स्पष्ट केलं. जुलै 2021 पर्यंत 30 कोटी लसींचं लक्ष्य असल्याचं पूनावाला यांनी सांगितलं. लस कशी वितरित करायची, कुठे करायची, किती प्रमाणात करायची ,किंमत किती असावी, किती डोस लागतील, याची चर्चा पंतप्रधानसोबत झाली. लसीबाबत योग्य माहिती प्रसारित करा.नागरिक पॅनिक होणार नाही, चुकीची माहिती प्रसारित करू नका, आधी शासकीय यंत्रणा किंवा निर्मात्यांकडून माहितीची खातरजमा करून घ्या, अशा सुचना पंतप्रधान मोदींनी दिल्याचंही आदर पूनावाला यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे सरकारच्या मागणीनुसार लसीचा पुरवठा करण्यात येणार आहे.

हेही वाचा..कोरोना लसचं वितरण सर्वात आधी भारतात करणार, आदर पुनावालांचा मोठा खुलासा

आदर पुनावाला म्हणाले, जगभरातील एकूण लसींपैकी 50-60 टक्के लसी भारतात बनवल्या जातात. याशिवाय आता आत्मनिर्भर भारत मोहिमेचा विचार करता आपण साथीरोगाशी लढण्यासाठी पुण्यातील मांजरी येथे सर्वात मोठी व्यवस्था उभी केली आहे. या व्यवस्थेचीही पंतप्रधान मोदी यांना माहिती देण्यात आली.

First published:

Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus, Maharashtra, Pune