S M L

जीतू जगताप आत्महत्ये प्रकरणातील आरोपी दीपक मानकरांवर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल

दीपक मानकर नेमके कोण आहेत ते यांच्यावर आतापर्यंत कोण कोणत्या प्रकरणात गुन्हे दाखल झालेयत पाहुयात...

Renuka Dhaybar | Updated On: Jun 3, 2018 06:36 PM IST

जीतू जगताप आत्महत्ये प्रकरणातील आरोपी दीपक मानकरांवर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल

पुणे, ता. 03 मे : पुण्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी शैलेश जगताप यांचा भाऊ जितेंद्र जगताप यानं हडपसर रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी म्हणजेच काल घडली होती.

जितेंद्र यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्‍त केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिपक मानकर, बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्यासह इतर 6 जणांविरूध्द लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जितेंद्र जगताप यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये त्यांनी दिपक मानकर, सुधीर कर्नाटकी आणि आत्महत्येपूर्वी फोटो काढलेल्या फोटोमधील सर्वजण आत्महत्येस कारणीभूत असल्याचं लिहिलं होतं. या सुसाईड नोटनुसार पोलिसांनी दिपक मानकर यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केलाय.दीपक मानकर नेमके कोण आहेत ते यांच्यावर आतापर्यंत कोण कोणत्या प्रकरणात गुन्हे दाखल झालेयत पाहुयात...

कोण आहेत मानकर?

- दीपक मानकर यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल झाले होते

Loading...
Loading...

- पुण्यामध्ये जमीन माफियी म्हणून मानकर यांची दहशत

- पुण्यात नातू कुटुंबीय, विजयकुमारसिंग यांच्यासह अनेकांना जमिनीसाठी धमकावलं होतं

- मानकर यांच्या विरोधात 12 पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 3, 2018 06:36 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close