स्थानिकांनी तातडीने याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने रिक्षा कॅनालमधून बाहेर काढली. पण, रिक्षामधील एक जण पाण्यात वाहून गेला आहे. स्थानिकांच्या अथक प्रयत्नांनंतर रिक्षातील व्यक्तीला वाचू शकले नाही. पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू आहे. पेट्रोल पंपावर कारला लागली अचानक आग दरम्यान, वसईत एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असलेल्या कारला अचानक आग लागली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पण यावेळी पेट्रोल पंपावर असलेल्या एका कर्मचाऱ्याने प्रसंगावधान दाखवत आगीवर नियंत्रण मिळवलं. त्याच्या या धडाकेबाज धाडसाचं आता सर्वत्र कौतुक होत आहे. संबंधित घटना ही वसई पश्चिमेला असलेल्या सागर शेत पेट्रोल पंपावर घडली. या घटनेची भीषणता भरपूर होती. संबंधित घटना पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे. त्याचे फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत घटना पाहिली तर आगीवर नियंत्रण मिळवता आलं नसतं तर मोठा अनर्थ घडला असता, असं आपल्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. पण गाडीचं प्रचंड नुकसान झालं आहे.#पुणे - जनता वसाहतमधील कॅनालमध्ये रिक्षा पलटी झाली, एक जण गेला वाहून pic.twitter.com/dWpXG0NIlM
— News18Lokmat (@News18lokmat) January 30, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune