Home /News /pune /

पुण्यात प्रवासी शिंकला म्हणून वैमानिकानं इमरजन्सी गेटमधून मारली उडी, पाहा VIDEO

पुण्यात प्रवासी शिंकला म्हणून वैमानिकानं इमरजन्सी गेटमधून मारली उडी, पाहा VIDEO

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

    पुणे, 23 मार्च : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुणे विमानतळावर असाच प्रसंग घडला आणि लोकांमध्ये गोंधळ उडाला. एअर एशिया इंडियाच्या पुणे-दिल्ली विमानात बसलेल्या एका प्रवाशाला जोरात शिंक आली. हा प्रवासी शिंकताच पायलटसह इतर क्रू मेंबर्सही घाबरले. शिंकणाऱ्या प्रवाशाला तत्काळ कोरोनाचा संशयीत रुग्ण असल्याचं समजून आपात्कालीन गेटमधून तत्काळ वैमानिकानंच थेट उडी मारली. एअर एशिया इंडियाचं I5-732 हे विमान पुण्याहून दिल्ली विमानतळावर प्रवाशांना घेऊन निघालं होतं. सर्व प्रवासी विमानात बसले आणि विमान दिल्लीसाठी निघणार एवढ्यात एका प्रवाशानं शिकण्यास सुरुवात केली. ह्या प्रवाशाला कोरोनाचा संशयित तर नाही असं विचार त्याच्या मनात आला आणि कोरोनाची आपल्यालाही लागण होईल या भीतीनं त्याने आपात्कालीन गेटमधून विमान तिथेच सोडून उडी मारली आहे. ही घटना पुणे विमानतळावर 20 मार्चरोजी घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. या घटनेमुळे पुणे विमानतळावर एकच गोंधळ उडाला होता. हे वाचा- Corona Virus : कैद्यांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून राज्यांना नव्या सूचना इमरजन्सी गेटमधून पायलटने उडी मारल्यानंतर सर्व प्रवाशांनीही मागच्या गेटमधून घाबरून बाहेर पडण्यास सुरुवात केली. फक्त शिंकणाऱ्या व्यक्तीला विमानत ठेवण्यात आलं. त्यानंतर सर्व प्रवाशांचं स्क्रिनिंग करण्यात आलं. या स्क्रिनिंग टेस्टमध्ये सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. या शिंकणाऱ्या प्रवाशाला सर्दी झाल्यानं शिंका येत होत्या अशी माहिती मिळाली आहे. मात्र लोकांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे मोठा धस्का घेतला. भारतात कोरोनामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार 415 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातील 22 राज्य आणि 80 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. हे वाचा- Corona Virus : कैद्यांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून राज्यांना नव्या सूचना
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Pune news, Symptoms of coronavirus

    पुढील बातम्या