• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • आर्यन खानसोबत जे घडलं एक आई म्हणून वाईट वाटतं -सुप्रिया सुळे

आर्यन खानसोबत जे घडलं एक आई म्हणून वाईट वाटतं -सुप्रिया सुळे

'समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेले आरोप खरे आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात राष्ट्रवादी पक्ष मलिकांच्या पाठीशी ठाम उभा आहे'

'समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेले आरोप खरे आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात राष्ट्रवादी पक्ष मलिकांच्या पाठीशी ठाम उभा आहे'

'समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेले आरोप खरे आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात राष्ट्रवादी पक्ष मलिकांच्या पाठीशी ठाम उभा आहे'

  • Share this:
पुणे, 31 ऑक्टोबर : मुंबई ड्रग्स पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा (sharukh khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan case) अखेर जामिनीवर सुटला आहे. पण दुसरीकडे, या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. आर्यन खानबाबत जे घडलं ते एक आई म्हणून वाईट वाटतं. ज्याच्याकडे काहीच सापडले नाही त्याला 26 दिवस कोठडी ठेवण्यात आलं, हा कुठला न्याय ? असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी उपस्थितीत केला. तसंच, त्यांनी नवाब मलिक (nawab malik) यांचीही जोरदार पाठराखण केली. पुण्यात पत्रकारांसोबत बोलत असताना आर्यन खान प्रकरणावर पत्रकारांनी प्रश्न विचारले असता सुप्रिया सुळे यांनी आपले सडेतोड भूमिका मांडली. 'एनसीबीने कशाप्रकारे केसेस उभ्या केल्यात याची पोलखोल नवाब मलिक यांनी केली आहे. त्यांनी केले आरोप हे योग्यच आहे. समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेले आरोप खरे आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात राष्ट्रवादी पक्ष मलिकांच्या पाठीशी ठाम उभा आहे, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. PM Mudra Yojna अंतर्गत 1999 रुपये जमा करुन 10 लाख लोन मिळवा; वाचा सविस्तर... 'आर्यन खानबाबत जे घडलं त्याबद्दल एक आई म्हणून वाईट वाटतं. ज्याच्याकडे काहीच सापडले नाही त्याला 26 दिवस कोठडी ठेवण्यात आलं, हा कुठला न्याय? समाजाने याचा विचार करण्याची गरज असून केंद्राला जाब विचारला पाहिजे. आर्यन खानबाबत मीडिया ट्रायल व्हायला नको होती, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. 'पुण्यात निवडणुकांची तयारी सुरू आहे. या निवडणुकीत पुण्यात महापौर राष्ट्रवादीचाच होणार आहे. पुण्यात महाविकास आघाडी होणार का, याचा निर्णय तिन्ही पक्षाचे वरिष्ठ घेतील, असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवाळीच्या आठ दिवसासाठी सिलेंडरचा भाव 1 हजारावरून 500 रुपये कमी करुन महिलांना भाऊबीज द्यावी, अशी मागणीही सुळेंनी केली. नगरमध्ये विवाहितेवर दोनदा गँगरेप; नराधमांनी हात-पाय बांधून दिल्या नरक यातना 'या मोदी सरकारने तपास यंत्रणांचा गैर वापर करत विरोधकांवर छापा टाकण्याचा नवा रेकॉर्ड केला आहे. अनिल देशमुख यांच्या घरावर तब्बल सात वेळा छापे टाकले, काही मिळत नाही तरीही छापे टाकत आहे', अशी टीकाही सुळेंनी केली.
Published by:sachin Salve
First published: