मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात तब्बल 5 कोटी किंमतीचं तरंगतं सोनं जप्त, असं काय हे प्रकरण?

पुण्यात तब्बल 5 कोटी किंमतीचं तरंगतं सोनं जप्त, असं काय हे प्रकरण?

Whale fish Ambergris एम्बरग्रीस हा एक मेणासारखा ज्वलशील पदार्थ असतो. जो हलक्या ग्रे किंवा काळ्या रंगाचा असतो. एम्बरग्रीस हे व्हेल माशाच्या शरीरात तयार होते..

Whale fish Ambergris एम्बरग्रीस हा एक मेणासारखा ज्वलशील पदार्थ असतो. जो हलक्या ग्रे किंवा काळ्या रंगाचा असतो. एम्बरग्रीस हे व्हेल माशाच्या शरीरात तयार होते..

Whale fish Ambergris एम्बरग्रीस हा एक मेणासारखा ज्वलशील पदार्थ असतो. जो हलक्या ग्रे किंवा काळ्या रंगाचा असतो. एम्बरग्रीस हे व्हेल माशाच्या शरीरात तयार होते..

पुणे, 28 ऑगस्ट : सोन्यापेक्षाही (gold) महाग समजल्या जाणारी  व्हेल माशाची (Whale fish) उलटी (Ambergris) तस्करीचं प्रकरण पुण्यात समोर आलं आहे. पुणे वनविभागाने (Pune Forest Department) धडाकेबाज कारवाई करत ही उलटी जप्त केली आहे. या उलटीची अंदाजे किंमत तब्बल 5 कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सहा आरोपींना अटक केली आहे. पुणे वनविभागाची ही पहिली मोठी कारवाई समजली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  एम्बरग्रीस ही एक असा पदार्थ आहे जो स्पर्म व्हेल माशाच्या (Whale fish) पोटात तयार होतो. एम्बरग्रीस हे समुद्रात तरंगताना अनेकदा आढळून आले आहे. गेल्या काही दिवसांत एम्बरग्रीसची तस्करी करण्याचे अनेक प्रकार भारतात आढळून आले आहेत. असंच प्रकरण पुणे वनविभागाने पूर्णानगर पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आणलं आहे.

Job Alert: वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर इथे प्राचार्य पदासाठी नोकरी

पूर्णानगरमध्ये व्हेलची उलटी विक्री करण्यासाठी अज्ञात इसम येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, सहाय्यक वनसंरक्षक, पुणे वनविभाग, वनपरिक्षेत्र अधिकारी, भांबुर्डा व वनकर्मचारी यांची बनावट ग्राहक बनवून पाठवण्यात आले आहे.  त्यावेळी, आरोपी मुहमदनईन मुटमतीअली चौधरी, योगेश्वर साखरे, अनिल कामठे, कृष्णात खोत,  ज्योतिबा जाधव, सुजाता जाधव अशी आरोपींची नाव आहे. यासर्व आरोपींना व्हेल माशाची उलटी विक्री करत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. या उलटीचा उपयोग हा अत्तर तयार करण्यासाठी करण्यात येणार होता.

महिलेला WhatsAppवरची एक छोटीशी चूक पडली महागात; चोरट्यांनी घातला लाखोंचा गंडा

पुणे वनविभागाने पूर्णानगरमध्ये  3 किलो व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) जप्त केले आहे. त्याचबरोबर एक Maruti Swift कंपनीची कार जप्त करण्यात आली असून ६ आरोपींना अटक केली आहे. ही कार्यवाही पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, मयूर बोठे, प्रदीप संकपाळ, महेश मेरगेवाड, विजय शिंदे, सुरेश बर्ले, रामेश्वर तेलंग्रे, महादेव चव्हाण, गणेश पाटील यांच्याकडून करण्यात आली.

काय असतं एम्बरग्रीस?

एम्बरग्रीस हा एक मेणासारखा ज्वलशील पदार्थ असतो. जो हलक्या ग्रे किंवा काळ्या रंगाचा असतो. एम्बरग्रीस हे व्हेल माशाच्या शरीरात तयार होते आणि व्हेल मासा ते तोंडाच्या माध्यमातून बाहेर फेकतो. याला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी किंमत आहे आणि त्यामुळे अनेकदा याची तस्करी होत असल्याचं समोर आलं आहे.

व्हेल माशाची उलटी इतकी महाग का?

एम्बरग्रीस म्हणजेच व्हेल माशाची उलटीची अनेक देशांत तस्करी केली जाते. बहुतेक देशांत याच्या खरेदी आणि विक्रीवर बंदी आहे. व्हेल माशाच्या उलटीची किंमत कोट्यावधी रुपयांत असते. ज्याचा उपयोग परफ्युम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळे परफ्यूमचा वास बराच काळ ठिकवून ठेवण्यास मदत होते.

First published: