• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • Alert! पुण्यात Weekend Lockdown सुरू; सोमवार सकाळपर्यंत असणार कडक पहारा, काय आहेत नवे नियम?

Alert! पुण्यात Weekend Lockdown सुरू; सोमवार सकाळपर्यंत असणार कडक पहारा, काय आहेत नवे नियम?

शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेपासून ते आता सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत केवळ दूध वितरण, अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय सेवा सुरू राहणार आहेत.

 • Share this:
  पुणे, 09 एप्रिल : संपूर्ण राज्याबरोबरच पुण्यातही ब्रेक द चेन अंतर्गत शुक्रवार सायंकाळपासून वीकेंड लॉकडाऊनच्या  (Weekend Lockdown in Pune) कडक अंमलबजावणीला सुरुवात झालीय. त्यामुळं शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेपासून ते आता सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत केवळ दूध वितरण, अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय सेवा सुरू राहणार आहेत. इतर सर्व सेवा या दरम्यान बंद असतील. वाचा - पुण्यालगतच्या ग्रामीण भागातही कोरोना स्थिती भीषण, स्थानिकांनाच मिळेनात बेड राज्यात लॉकडाऊन केल्यानंतर सरकार आणि व्यापारी आमनेसामने असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. एकिककं व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. मात्र दुसरीकडं राज्यात शुक्रवारी सायंकाळपासून ते सोमवारी सकाळपर्यंतच्या कडक वीकेंड लॉकडाऊनला सुरुवात झालीय. पुण्यातही या वीकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करणार असल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. त्यानुसार केवळ दूध वितरण आणि वैद्यकीय सेवा वगळता कोणालाही दुकानं सुरू करण्याची परवानगी नसणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारनं ब्रेक द चेन अंतर्गत दर आठवड्याला अशाप्रकारे शुक्रवारी सायंकाळी ते सोमवारी सकाळपर्यंतचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. वाचा - उसाचा रस पिण्यासाठी भर रस्त्यात थांबवली कोरोना बाधित रुग्णाची Ambulance हे सुरू राहणार सहकारी क्षेत्राची कार्यालये, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँका, विमा कंपन्यांची कार्यालये, टेलिफोन कंपन्यांची कार्यालये, आय टी कंपन्यांची कार्यालये, वकिलांशी संबंधितत कार्यालये तसेच सीए आणि आर्थिक व्यव्हारांशी संबंधित कार्यालये या दरम्यान सुरू राहतील. हे बंद राहणार या वीकेंड लॉकडाऊनदरम्यान प्रामुख्याने सर्व खासगी कार्यालये बंद राहतील. शहरातील सर्व बाजारपेठा आणि दुकाने बंदराहतील. हॉटेल, रेस्तरॉ आणि बार आधीच बंद करण्यात आले आहेत. लॉजिंग हॉटेलमध्ये केवळ रूम सर्व्हिस सुरू राहील, तेही शहराच्या हद्दीत.
  Published by:News18 Desk
  First published: