Home /News /pune /

Weather Update: उत्तर भारत गारठला; येत्या 2 दिवसात महाराष्ट्रातही वाढणार थंडी

Weather Update: उत्तर भारत गारठला; येत्या 2 दिवसात महाराष्ट्रातही वाढणार थंडी

Weather in Maharashtra: नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा सरल्यानंतर देखील राज्यात अपेक्षित थंडी पडली नाही. पण येत्या दोन दिवसांत राज्यात कडाक्याची थंडी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

    मुंबई, 07 डिसेंबर: अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (Low Pressure area) गेली काही दिवस महाराष्ट्रासह दक्षिण भारतात जोरदार पाऊस कोसळला (heavy rainfall in maharashtra) आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरात (bay of bengal) निर्माण झालेल्या 'जवाद' चक्रीवादळाचा (Cyclone Jawad) भारताच्या पूर्व किनारपट्टी चांगलाच फटका बसला आहे. पण गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात पाऊस पूर्णपणे थांबला आहे. पण नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा सरल्यानंतर देखील राज्यात अपेक्षित थंडी पडली नाही. पण येत्या दोन दिवसांत राज्यात कडाक्याची थंडी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. सध्या हिमालयात पश्चिमी चक्रवात परिस्थिती निर्माण झाली आहे. थंडगार वारे हिमालयाकडून महाराष्ट्राच्या दिशेनं वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत राज्यात थंडी वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हेही वाचा-Omicron corona variant: भारतात वेगानं पसरतोय ओमिक्रॉन; 5 राज्यात आढळले 21 रुग्ण 9 डिसेंबरपासून महाराष्ट्रासह देशात थंडीचा कडाका आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. तर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गारठा अधिक तीव्र होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. पुणे आणि मुंबई परिसरात देखील पहाटे गारठा वाढला आहे. तसेच पहाटे वातावरणात मोठ्या प्रमाणात धुकं पडत आहे. त्यामुळे रात्रीचा किंवा पहाटेचा प्रवास करणाऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात देखील गारठा वाढला आहे. आज हवेली याठिकाणी 14.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ पाषाण याठिकाणी 14.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदलं गेलं आहे. यासोबतच पुण्यातील एनडीए आणि शिवाजीनगर  याठिकाणी अनुक्रमे 15 आणि 15.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत पुण्यात किंचितशी वाढ नोंदली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Weather

    पुढील बातम्या