पुण्यासह राज्यात पुढील 48 तासांत 'मुसळधार', सतर्कतेचा इशारा

पुण्यासह राज्यात पुढील 48 तासांत 'मुसळधार', सतर्कतेचा इशारा

गुलाबी थंडीत येणारी दिवाळी यावेळी ऐन पावसात साजरी करावी लागणार, अशी चिन्हे आहेत.

  • Share this:

पुणे,23 ऑक्टोबर: पुण्यासह राज्यात पुढील 48 तासांत मुसळधार पाऊसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. बुधवारी रात्रीही पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या काही भागातही जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो. राज्यात 27 ऑक्टोबरपर्यत पाऊस राहणार असून बंगाल आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस स्थिती निर्माण झाल्याचे पुणे वेधशाळेचे अधिकारी अनुपम कश्यप यांनी सांगितले आहे. तसेच मुंबई वेधशाळेने राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शनिवारपर्यंत राज्यभरात पावसाचं प्रमाण कमी-अधिक असेल. त्यामुळे गुलाबी थंडीत येणारी दिवाळी यावेळी ऐन पावसात साजरी करावी लागणार, अशी चिन्हे आहेत.

पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत मंगळवार आणि बुधवार मुसळधार पाऊस पडू शकतो, त्यामुळे सतर्क राहा, असा इशारा देण्यात आला आहे. काही भागात वादळी वाऱ्यांसह, ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारपर्यंत सतर्कतेचा इशारा म्हणजे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

पिकांचे मोठे नुकसान...

महाराष्ट्रातल्या कोकण, मध्य महाराष्ट्रासह, विदर्भ आणि मराठवाड्यात लांबलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात काढून ठेवलेला मका, बाजरी, ज्वारी, कपाशी पीक पूर्णपणे नष्ट झाले. या पावसाचा द्राक्ष बागांना देखील मोठा फटका बसलाला मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यात कापणी केलेले भातपीक पुरते वाया गेले आहे.

राज्यात पावसाचा कहर सुरूच आहे. या पावसामुळे हाती आलेली बाजरी, ज्वारी, मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात चाळीसगावमध्ये मुसळधार पावसामुळे 40 टक्क्यांहून अधिक मका, बाजरी, ज्वारी पीक खराब झाले आहे. सोयाबीन पीक शेतात सडू लागली आहेत. येत्या 24 तासांत राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दुष्काळी बीड, लातूर आणि उस्मानाबाद मध्ये पाऊस पडत आहे. पण हाती आलेले पीक वाया गेले आहे. परभणीत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पडत असून कापूस, मका पिकाचे नुकसान झाले आहे.

पुणे, सांगली, सातारा कोल्हापूर, नगर आणि सिंधुदुर्गमध्येही पाऊस पडतोय. कोकणात भात पिकाचे मोठे नुकसान या पावसाने केले आहे. राज्यात महसूल यंत्रणा निवडणूक कामात अडकल्याने पंचनाम्याना उशीर होते असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. रायगडमध्ये गेली तीन दिवस जोरदार पाऊस पडत आहे. परतीच्या या पावसामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेले भाताचे पिक धोक्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात पावसाच्या पाण्यावर अवलंबुन भातशेती केली जाते. आता शेतातील भाताचे पिक कापणीसाठी तयार झाले असुन काही अंशी कापणी झाली आहे. पण परतीच्या पावसाने रायगडमधील शेतकऱ्याची झोप उडवली आहे. गेली दोन दिवस संपुर्ण रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असुन यामुळे शेतातील भाताचे पिक पडले आहे तर कापणी झालेले भाताचे पिक शेतात भिजत आहे. यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.

वाशिम जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत आहे. तर सकाळच्या सुमारास दाट धुक्याची चादर पसरत असल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आज सकाळी 10 वाजेपर्यंत या धुक्यामुळे मुंबई-नागपूर महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सतत पडत असलेल्या या धुक्यामुळे भाजीपाला पिकासह तूर पिकाला याचा फटका बसणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

नुकसानाचे पंचनामे मतमोजणीनंतर...

पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर करण्यात येईल. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार त्याचबरोबर महसूल यंत्रणा मतमोजणी कामात व्यग्र आहे. हे पाहता मतमोजणी पूर्ण झाली की पंचनामे सुरू होतील, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

का पडतोय अवकाळी पाऊस?

सध्या राज्यात पडत असलेला पाऊस हा बिगरमोसमी पाऊस आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यातच ईशान्य मान्सून वाऱ्यांनी दक्षिण भारतात पावसाला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक भागात आर्द्रता कमी झालेली नाही.

VIDEO : विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी दिला बेदम चोप

Published by: Sandip Parolekar
First published: October 23, 2019, 11:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading