Alert : पुढचे किमान 2 दिवस मुसळधार; 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

Alert : पुढचे किमान 2 दिवस मुसळधार; 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेला पावसाळा आठवडाभर तरी त्रास देणार, अशी चिन्हं आहेत. काही जिल्ह्यांना orange alert जारी करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 22 ऑक्टोबर : मान्सूनचा पाऊस माघारी गेल्याची बातमी आली, तरी प्रत्यक्षात राज्यातला पाऊस अजूनही थांबलेला नाही. पुणे, मुंबईसह, (Pune rain), (Mumbai rain) कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेला पावसाळा (Mumbai rain) आठवडाभर तरी त्रास देणार, अशी चिन्हं आहेत.

राज्याच्या काही भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा (weather alert) देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता कोकण, मध्य महाराष्ट्रात आहे. मराठवाड्याच्या काही भागातही जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो. मुंबई वेधशाळेने 8 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट (orange alert) जारी केला आहे.

का पडतोय अवकाळी पाऊस?

सध्या राज्यात पडत असलेला पाऊस हा बिगरमोसमी पाऊस आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यातच ईशान्य मान्सून वाऱ्यांनी दक्षिण भारतात पावसाला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक भागात आर्द्रता कमी झालेली नाही.

मुसळधार पावसामुळे पुणेकरांचे हाल! तीव्रता दाखवणारे पाहा 10 PHOTOS

कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्याने पाऊस पडत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. ही स्थिती पुढचा आठवडाभर कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दिवाळी पाण्यात जाणार, अशी शक्यता आहे.

कुठे आहे Alert?

मुंबई वेधशाळेने 8 जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याचा अर्थ या जिल्ह्यांमध्ये काही भागात वादळी वाऱ्यांसह, ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारपर्यंत सतर्कतेचा इशारा म्हणजे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत मंगळवार आणि बुधवार मुसळधार पाऊस पडू शकतो, त्यामुळे सतर्क राहा, असा इशारा देण्यात आला आहे.

VIDEO: मुंबई पोलिसांना जबर मारहाण, संतप्त नागरिकांनी फोडल्या गाड्या

त्यानंतरही शनिवारपर्यंत राज्यभरात पावसाचं प्रमाण कमी-अधिक असेल. पण त्यामुळे गुलाबी थंडीत येणारी दिवाळी यावेळी ऐन पावसात साजरी करावी लागणार अशी चिन्हं आहेत.

पुण्यात इशारा

पुणे शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

वाचा - दिवाळीत दम्याच्या रुग्णांसाठी या खास टिप्स, धुराने होणार नाही इन्फेक्शन!

बुधवारसाठीही हा इशारा आहे. त्यानंतर पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.

असं राहील पावसाचं प्रमाण

मराठवाड्यात विजांसह पाऊस

मराठवाड्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

कोकण किनारपट्टीवर आठ दिवस पाऊसधारा

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणात पुढचा आठवडाभर हवामान ढगाळ राहणार असून काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो.

--------------------------

अन्य बातम्या

तुमच्या चेहऱ्यात असतील 'या' गोष्टी तर मिळतील 92 लाख रुपये!

...पण अखेरच्या क्षणी सलमानच्या लग्नात आली 'ही' अडचण, 20 वर्षांनंतर सत्य समोर

'पंतप्रधानांनी मला सांगितलं, कसं मोदीविरोधात बोलण्यास भाग पाडतात'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 06:20 PM IST

ताज्या बातम्या