पुणे, 31 जुलै: मागील पंधरा दिवस कोकण आणि घाटमाथ्यावर थैमान (Heavy Rainfall) घातल्यानंतर आता राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील बहुतांशी ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली आहे. पण कोकण आणि घाट परिसरात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. पुढील काही दिवस राज्यात हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. आज राज्यात चार जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट (Yellow Alert) दिला आहे. उर्वरित महाराष्ट्रात कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे.
आज पुण्यासह सातारा, रायगड आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबई वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार, संबंधित चार जिल्ह्यांत पुढील दोन-तीन तासांत वेगवान वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर उद्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा शुकशुकाट राहणार आहे. 4 जुलै पर्यंत राज्यात कमी -अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे.
हेही वाचा-कोरोनाने रूप बदलल्यावर लक्षणंही बदलली, लस घेतलेल्यांनाही सावध राहण्याचा इशारा!उत्तर अरबी समुद्रात वादळी वाऱ्याची शक्यता
मागील आठवड्यात महाराष्ट्राल झोडपल्यानंतर पावसानं उत्तर भारताकडे मार्गक्रमण केलं आहे. आज मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे, उत्तप अरबी समुद्रासह महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टी परिसरात वेगवान वारा वाहण्याची शक्यता आहे.
As per IMD a/n bulletin today 31/7; there could be winds of 40-50kmph gusting to 60kmph over North Arabian Sea & along & off Gujarat - Maharashtra frm 31Jul - 4 Aug
Fishermen r advised not to venture into these area during this period.
-IMD
For further details pl visit IMD sites.
हेही वाचा-कांजण्याप्रमाणेच पसरतोय डेल्टाचा संसर्ग, लसीकरण झालेल्या लोकांनाही धोका?
काही ठिकाणी 40 ते 50 किमी प्रतितास वेगानं वारा वाहणार आहे, तर काही ठिकाणी 60 किमी प्रतितास पेक्षा अधिक वेगानं वारा वाहू शकतो. त्यामुळे मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पुढील किमान पाच दिवस हीच स्थिती राहणार आहे. त्यामुळे मच्छिमारांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.