पुणे, 14 ऑगस्ट: जवळपास गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून राज्यात मान्सूननं (Monsoon in Maharashtra) दडी मारली आहे. त्यानंतर आता राज्यात पुन्हा मान्सून परतीसाठी पोषक हवामान तयार होतं आहे. विकेंडनंतर राज्यात चांगल्या पावसाची अपेक्षा हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी पावसाची स्थिती (Rain in Maharashtra) आहे. उद्याचा दिवस वगळता आजपासून राज्यात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजही राज्यात पाच जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.
आज पुण्यासह सातारा, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. संबंधित पाच जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, 30-40 किमी प्रतितास वेगानं वारा वाहण्याची शक्यता आहे. उद्या मात्र राज्यात पुन्हा पावसाची उघडीप असणार आहेत. त्यानंतर सलग तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
हेही वाचा-पुणेकरांची चिंता वाढली; ग्रामीणपाठोपाठ आता शहरातही Delta Plusचा शिरकाव
मराठवाड्यात विजांचा कडकडाट
मराठवाड्यासह आजूबाजूंच्या जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मान्सूननं उघडीप घेतली असली तरी, मराठवाड्यात मात्र विजांचा कडकडाट होण्याचं प्रमाण वाढलं आहे. आजही मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या आठ जिल्ह्यांत विजांचा कडकडाट होणार आहे. काही ठिकाणी विज कोसळण्याचा धोका देखील आहे. त्यामुळे आकाशात विजा चमकत असताना नागिकांनी घराबाहेर पडून नये आणि मोठ्या झाडाच्या आडोशाला उभं राहू नये असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
Severe weather warning issued by IMD for Maharashtra for 14-18 Aug, Parts Konkan & M Mah D1,D4,D5 isol heavy rainfall warning, Possibility of Rainfall associated with TS🌩 & lightning interior of state D3-D5 The area covered under is increasing is good sign for state. pic.twitter.com/9j4xj2Yegm
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 14, 2021
हेही वाचा-'लस घेऊनही 18 जणांना डेल्टा प्लसची लागण; ते 5 मृत्यू या व्हेरिएंटमुळे नाही'
खरंतर, सध्या बिहार आणि आसपासच्या परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. परिणामी दक्षिण मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Weather forecast