पुणे, 12 जुलै: रविवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणांना पावसानं (Rain) झोडपून काढलं आहे. तर धुळे, सातारा, सोलापूर, नांदेड, परभणी आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत देखील मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या आहे. आज पुन्हा राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. हीच स्थिती पुढील पाच दिवस राज्यात कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
आज पुण्यासह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. आज रायगड, रत्नागिरी सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान खात्यानं रेड अलर्ट (Red alert) जारी केला आहे. तर पुणे, पालघर, ठाणे, मुंबई, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे. त्यामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भाग वगळता आज महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील आणखी चार दिवस राज्यात हीच स्थिती कायम राहणार आहे.
१२ जुलै, महाराष्ट्र राज्यात येत्या 5 दिवसा साठी IMD ने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कृपया IMD चे अपडेट्स पाहत राहा. pic.twitter.com/w3yXQ77O0R
हेही वाचा-महिलेला कोव्हॅक्सिनऐवजी दिला कोविशल्डचा डोस, त्यानंतर घडला धक्कादायक प्रकार
आज सकाळपासूनचं पुणे, ठाणे, मुंबई आणि उपनगरात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. आज दिवसभर मुबंईत अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू होती. सायंकाळनंतर मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मागील सहा तासांत दक्षिण मुंबई, पूर्व उपनगरात आणि बोरीवली परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत.
हेही वाचा-कोरोना लसीचा दुसरा डोस घेणं का आवश्यक आहे? जाणून घ्या
दरम्यानच्या काळात टाटा पॉवर याठिकाणी 61 मीमी, चेंबूर आणि वडाळा परिसरात 42 मीमी, विद्याविहार आणि मीरा रोड परिसरात 44 मीमी पावसाची नोंद झाली आहे. अन्य भागात मात्र पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. तर आज विदर्भात जवळपास सर्वचं ठिकाणी कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भात आज पावसाची शक्यता खूपच कमी आहे. मात्र तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.