मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Weather Update: राज्यात कोरडं हवामान; दुपारनंतर पुण्यासह या जिल्ह्यांत पावसाची शक्यता

Weather Update: राज्यात कोरडं हवामान; दुपारनंतर पुण्यासह या जिल्ह्यांत पावसाची शक्यता

विकेंडनंतर राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

विकेंडनंतर राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Weather forecast:आज पुण्यासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांत हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 29 जून: खोळंबलेल्या पेरण्या आणि उभ्या असलेल्या पिकांसाठी राज्यातील शेतकऱ्याला अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला दिमाखात आगमन केलेल्या पावसानं (Monsoon Rain) मागील पंधरा दिवसांपासून राज्यात दडी मारली आहे. मधल्या काळात राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या आहेत. पण राज्यात अजूनही अपेक्षेप्रमाणे मान्सून सक्रिय झाला नाही. मागील दोन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. पण आज पुन्हा राज्यात मान्सूननं दडी मारली आहे. आज पुन्हा सकाळपासून राज्यात कोरड्या हवामानाची नोंद झाली आहे.

पण दुपारनंतर पुण्यासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांत हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे. आज पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्याच्या साथीन तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

दुपारनंतर पुण्यात पाऊस

आज सकाळपासूनचं पुणे शहरात आणि परिसरात दिवसभर अंशतः ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे दुपारनंतर पुण्यासह सातारा, अहमनगर या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. सोमवारी पुण्यात 12 मिलिलीटर पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा- Weather Forecast: राज्यात 3 दिवस पावसाचे; आज पुण्यासह या जिल्ह्यांत मेघ गरजणार

शनिवारपासून (26 जून) राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय झाल्याचे संकेत मिळाले. दरम्यान राज्यात तुरळक ठिकाणी चांगल्या पावसाची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील काही तालुक्यांना पावसानं झोडपूनही काढलं होतं. तर मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. आज पुन्हा राज्यात कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. 5 जुलैनंतर राज्यात पुन्हा मान्सूनचं जोरात आगमन होईल, अशी माहिती भारतीय हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी दिली आहे.

First published:

Tags: Maharashtra, Pune