Home /News /pune /

Weather Forecast Today: आज पुण्यासह या जिल्ह्यांत होणार मेघगर्जना; हवामान खात्यानं दिला इशारा

Weather Forecast Today: आज पुण्यासह या जिल्ह्यांत होणार मेघगर्जना; हवामान खात्यानं दिला इशारा

प्रतिकात्मक फोटो.

प्रतिकात्मक फोटो.

Weather in Maharashtra: आज राज्यात एकूण नऊ जिल्ह्यांना हवामान खात्यानं अलर्ट ( IMD Alert) जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

    पुणे, 28 जुलै: गेल्या आठवड्यात कोकण (Konkan) आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसानं झोडपल्यानंतर (Heavy Rainfall) आता संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. कोकणात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज राज्यात एकूण नऊ जिल्ह्यांना हवामान खात्यानं (IMD) येलो अलर्ट (Yellow Alert) दिला आहे. संबंधित जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. आज पुण्यासह ठाणे, पालघर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, नाशिक आणि नंदुरबार या नऊ जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळणार आहे. उर्वरित महाराष्ट्रात आज कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. याठिकाणी पावसाची शक्यता खूप कमी आहे. आजपासून पुढील पाच दिवस राज्यात कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे. हेही वाचा-पुण्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली; गाठला 9 महिन्यांचा निच्चांक पुढील तासाभरात पुणे, नाशिक, ठाणे, रायगड, पालघर आणि घाट परिसरात तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज सकाळपासूनचं या जिल्ह्यांत ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. सायंकाळनंतर याठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो. दुसरीकडे मुंबईत आज अंशतः ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पण मुंबईत आज पावसाची शक्यता कमी आहे. हेही वाचा- दर 15 मिनिटांनी पुणेकरांना मिळणार पावसाचं LIVE अपडेट; शेतकऱ्यांना होणार दुप्पट फायदा, मोबाइल अ‍ॅप लॉन्च काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता सध्या कमी झाली आहे. तसेच कोकण किनारपट्टीला समांतर असलेला हवेचा कमी दाबाच्या पट्याचा प्रभावही कमी झाला आहे. त्यामुळे कोकणासह घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील पाच दिवस कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात हीच स्थिती कायम राहणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Pune rain, Weather forecast

    पुढील बातम्या