• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • Weather Forecast: पुढील 3 तासांत पुण्यात धडकणार पाऊस, या जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

Weather Forecast: पुढील 3 तासांत पुण्यात धडकणार पाऊस, या जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

Weather Forecast Today: पुढील तीन तासांत पुण्यासह (Pune) चार जिल्ह्यांत जोरदार पाऊस धडकणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे.

 • Share this:
  पुणे, 30 जुलै: मागील तीन चार दिवसांपासून राज्यात पावसानं (Rain) दडी मारली आहे. राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामानाची (Cloudy Weather) नोंद करण्यात येत आहे. पण त्याठिकाणी अपेक्षित सरी कोसळत नाहीत. पण पुढील तीन तासांत पुण्यासह चार जिल्ह्यांत जोरदार पाऊस धडकणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे. पुणे (Pune), ठाणे (Thane), रायगड (Raigad) आणि साताऱ्यात (Satara) पुढील तीन तासांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. आज सकाळपासूनच, पुणे, रायगड, ठाणे आणि सातारा परिसरात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं वारा वाहण्याची शक्यता आहे. तर मुंबईत आज अंशतः ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरात हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. दुसरीकडे, विदर्भातही अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. आज सकाळपासूनच याठिकाणी ढगाळ हवामान असून वेगवान वारा वाहत आहे. हेही वाचा-कोरोना लशीचा डोस घेतल्यावर मेसेज आला नाही तर Vaccine Certificate कसं मिळवायचं? हवामान खात्यानं आज ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना येलो अ‌ॅलर्ट दिला आहे. तर उद्या 31 जुलै रोजी चार जिल्ह्यांत येलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. त्यामध्ये रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यांचा समावेश आहे. तर पुढील आणखी तीन दिवस कोकणात हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. 2 ऑगस्टपर्यंत कोकणात बहुतांशी ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा पाऊस जोर पकडण्याची शक्यता आहे. हेही वाचा-जर्मन राष्ट्राध्यक्षांनी घेतले दोन वेगवेगळ्या लशींचे डोस; लस कॉम्बिनेशन फायदेशीर विदर्भ मराठवाड्यात पावसाची निराशा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला पावसानं झोडपून पुरस्थिती निर्माण केली असली, तरी अद्याप विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अद्याप अपेक्षित पाऊस कोसळला नाही. दरम्यान अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या आहेत. पुढील आठवड्यात विदर्भासह मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे.
  Published by:News18 Desk
  First published: