Home /News /pune /

Weather Forecast: पाऊस संपताच महाराष्ट्र गारठला; पुण्यात तापमानाचा पारा 13 अंशावर

Weather Forecast: पाऊस संपताच महाराष्ट्र गारठला; पुण्यात तापमानाचा पारा 13 अंशावर

Weather in Maharashtra: पावसाचं सावट दूर झालं असलं तरी आता राज्यात उत्तरेकडील थंड हवेचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात महाराष्ट्रात गारठा वाढणार आहे.

    पुणे, 06 डिसेंबर: अरबी समुद्रात (Arabian Sea) निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (Low pressure area) आणि बंगालच्या उपसागरातील (Bay of Bengal) 'जवाद' चक्रीवादळामुळे (Cyclone jawad) गेले काही दिवस पुण्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला (Rainfall in maharashtra) आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांना अवकाळी पावसानं चांगलच झोडपून काढलं आहे. यामुळे परिसरात शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे. पण आता महाराष्ट्रावरील पावसाचं सावट दूर झालं आहे. पुढील आठवडाभर राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्यावरील पावसाचं सावट दूर झालं असलं तरी आता राज्यात उत्तरेकडील थंड हवेचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात महाराष्ट्रात गारठा वाढणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी  किमान तापमानात घट झाली आहे. पुण्यात देखील पावसानं उघडीप घेतल्यानंतर, तापमानाचा पारा घसरला आहे. तसेच पहाटे वातावरणात धुक्याचं साम्राज्य निर्माण झालं आहे. त्यामुळे पहाटे व्यायामाला बाहेर पडणारे नागरिक देखील स्वेटर घालून बाहेर पडत आहेत. रविवारी महाबळेश्वर येथे सर्वात कमी 12.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. मुंबई आणि पुण्यात देखील तापमानाचा पारा घसरला आहे. रविवारी मुंबईत 22 अंश सेल्सिअस किमान तापमानाची  नोंद झाली आहे. तसेच आज सकाळी पुण्यात पाषाण याठिकाणी सर्वात कमी 13.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर हवेली 13.8, एनडीए 14.2, राजगुरुनगर 14.8, शिवाजीनगर 14.7 आणि माळीण येथे 14.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. हेही वाचा-Omicron corona variant: भारतात वेगानं पसरतोय ओमिक्रॉन; 5 राज्यात आढळले 21 रुग्ण हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र विरल्यामुळे आता पुण्यासह राज्यात हळूहळू थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी पडत असून 15 डिसेंबरनंतर थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने पुढील आठवडाभर राज्यात कोणताही इशारा दिला नाही. पुढील पाचही दिवस राज्यात कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ढगाळ हवामान पडण्याची शक्यता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Weather forecast

    पुढील बातम्या