मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Weather Forecast: आज पुण्यासह पाच जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा; हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी

Weather Forecast: आज पुण्यासह पाच जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा; हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी

Weather Update: गेल्या आठवड्यापासून पुण्यासह घाट परिसरात आणि कोकण किनारपट्टीवर तर पावसानं धुमशान घातलं आहे. आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy to very heavy rainfall) पावसाची शक्यता आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 14 जुलै: गेल्या आठवड्यापासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. पुण्यासह घाट परिसरात आणि कोकण किनारपट्टीवर तर पावसानं धुमशान घातलं आहे. आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy to very heavy rainfall) पावसाची शक्यता आहे. पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यांना आज भारतीय हवामान खात्यानं (IMD) रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यांत आज अनेक ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे.

हवामान खात्यानं जारी केलेल्या अंदाजानुसार, पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यात पुढील चोवीस तासांत 204.4 मिलिमिटर पेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. गुरुवार नंतर राज्यात पावासाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. यासोबत आज मुंबईसह ठाणे परिसरात हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा-मुंबईकरांना 21 दिवसांतच कोरोना सुरक्षा कवच; 28 दिवस प्रतीक्षा करण्याची गरज नाही

मागील दोन दिवसांत रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यात अनुक्रमे 135.5 आणि 137.7 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. या दोन जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम राहाणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

मान्सूननं संपूर्ण देशाला व्यापलं

जून महिन्याच्या सुरुवातीला नैऋत्य मोसमी (Southwest) वाऱ्यांनी केरळात दिमाखात आगमन केलं होतं. त्यानं अवघ्या काही दिवसांतच मान्सूननं (Monsoon) कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र राज्याला व्यापत उत्तरेत प्रवास केला होता. पण काही दिवस जोरदार पाऊस झाल्यानंतर उत्तरेत मान्सून मंदावला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी तापमानात देखील वाढ झाली होती. जवळपास 20 दिवसांचा ब्रेक घेतल्यानंतर देशात पुन्हा मान्सून वापसी (Monsoon Comeback) झाली आहे. यानंतर आता मान्सून दिल्लीसह संपूर्ण देशाला व्यापल्याची (Monsoon covers entire country) अधिकृत माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

First published:

Tags: Maharashtra, Monsoon, Pune, Weather forecast