• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • Weather Alert! कोकणात आजही मुसळधार पाऊस; पुण्यासह 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट

Weather Alert! कोकणात आजही मुसळधार पाऊस; पुण्यासह 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट

Weather Forecast: मागील दोन दिवसांपासून कोकणात (Konkan) पावसानं थैमान (Heavy rainfall) घातलं आहेत. आज राज्यात एकूण 11 जिल्ह्यांना हवामान खात्यानं हाय अलर्ट दिला आहे.

 • Share this:
  पुणे, 23 जुलै: मागील दोन दिवसांपासून कोकणात (Konkan) पावसानं थैमान (Heavy Rainfall) घातलं आहेत. आजही कोकणात पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकणात बहुतांशी ठिकाणी आज जोरदार पावसाची शक्यता आहे. आज राज्यात एकूण सहा जिल्ह्यांना हवामान खात्यानं (IMD) रेड अलर्ट (Red alert) जारी केला आहे. तर पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange alert) देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात बहुतांशी ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy to very heavy rainfall) पावसाची शक्यता आहे. उद्यापासून पुढील पाच दिवसांत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. आज पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा राज्यांना हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबईसह पालघर, ठाणे, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यांत अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. हेही वाचा-रत्नागिरीत पावसाचं थैमान; आकाशातून टिपलेल्या PHOTOS मधून दिसला पुराचा रुद्रावतार आज सकाळपासूनचं रायगड, रोहा भिरा, माथेरान, श्रीवर्धने, ठाणे, कल्याण, रत्नागिरी, दापोली, हरनाई, सातारा, महाबळेश्वर, पुणे आणि घाट परिसरात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. या परिसरात काळ्या ढगांची जोरदार दाटी झाली आहे. त्यामुळे याठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हेही वाचा-कोल्हापूर महापुराचा फटका रुग्णालयांना; बोटीतून रुग्णांचे स्थलांतर, पाहा VIDEO मागील काही दिवसांपासून महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर वाढतचं चालला आहे. मागील 48 तासांत महाबळेश्वरमध्ये तब्बल 1074.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर आज सकाळी साडे आठ वाजल्यापासून अडीच वाजेपर्यंत तब्बल 142.2 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात ढगांची दाटी झाली आहे. हवामान खात्यानं या चार जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: