मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

"शरद पवारांना पंतप्रधान अन् अजितदादांना मुख्यमंत्रिपदावर बसलेलं बघायचंय" : खासदार अमोल कोल्हे

"शरद पवारांना पंतप्रधान अन् अजितदादांना मुख्यमंत्रिपदावर बसलेलं बघायचंय" : खासदार अमोल कोल्हे

"शरद पवार साहेबांना पंतप्रधान अन् अजितदादांना मुख्यमंत्री करायचंय"

"शरद पवार साहेबांना पंतप्रधान अन् अजितदादांना मुख्यमंत्री करायचंय"

Amol Kolhe said I want to see Sharad Pawar as PM and Ajit Pawar as CM: शरद पवार यांनी पंतप्रधान तर अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं आहे असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केलं आहे.

  • Published by:  Sunil Desale

पुणे, 2 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना देशाचे पंतप्रधान आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना राज्याचा मुख्यमंत्रिपदावर बसलेलं आपल्याला पहायचं आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला गालणे आवश्यक असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी केलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमोल कोल्हे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

अमोल कोल्हे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना म्हटलं, शरद पवार साहेबांना देशाच्या पंतप्रधानपदावर बसलेलं पहायचं असेल तर त्यांना पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालवायला लावू नका. पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांना लक्ष घालायला लावू नका. यासोबतच अजित पवारांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी आता कामाला लागण्याची आवश्यकता आहे.

अजित पवारांनी पिंपरी चिंचवडसाठी खूपकाही केलं आहे, शहराचा कायापालट केला आहे. पिंपरी चिंचवडचा कायापालट करणारे अजित पवार यांना राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर बसलेलं पहायलं आहे असंही खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

पुण्यात शरद पवार आणि नितीन गडकरींची भेट

2 ऑक्टोबर रोजी सकाळी महाराष्ट्रातील राजकारणातील दोन दिग्गज नेत्यांमध्ये भेट झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात बैठक झाली आहे. पुणे विमानतळावर दोन्ही नेत्यांमध्ये ही बैठक झाली असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार गिरीश बापट, सुनील तटकरे आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांची भेट घेतली.

या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना म्हटले, मुंबई-गोवा महामार्गाची जी काही चाळण झाली आहे त्यामध्ये पळसपा ते इंदापूर हा रस्ता खाजगीकरणाच्या माध्यमातून विकसित होत आहे. त्या ठिकाणी डंबरीकरणाऐवजी काँक्रिटीकरणाचं काम घेण्यात यावं. त्यासाठी 200 कोटी रुपयांचा निधी अधिक लागेल. असं मी गडकरींसमोर मत मांडलं. यावर गडकरींनी 5 ऑक्टोबर रोजी एक उच्चस्तरीय बैठक दिल्लीत आयोजित केली आहे. यावेळी पनवेल - इंदापूर महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला व पुण्यातील इतर विकासकामांविषयी चर्चा केली.

अजितदादांना सकाळी - सकाळी नितीन गडकरींचा फोन आला आणि म्हणाले...

पुण्यात 24 सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दोन उड्डाणपुलांचे भूमिपूजन पार पडले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, निलम गोऱ्हे, चंद्रकांत पाटील सुद्दा उपस्थित होते. यावेळी अजित पवार म्हणाले, "मला मध्यंतरी गडकरींनी सांगितलं होतं मी मुंबईत येतो... उद्धवजी ठाकरे साहेब, तू, अशोक चव्हाण, स्वत: गडकरी साहेब आणि त्यांची अधिकाऱ्यांची टीम... राज्य सरकारमधील काही प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत किंवा दोगांच्या समन्वयातील प्रश्न सोडवण्यासाठी निर्णय घेण्याची गरज आहे. त्याबाबतची मिटींग लावा. काल मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की, उद्या गडकरी साहेबांसोबत दोन कार्यक्रम आहेत. सीएम साहेबांनी सांगितलं, गडकरी साहेबांना जी वेळ सोईची आहे ती सांगावी, सह्याद्रीवर तशी मिटींग आयोजित करु."

First published:

Tags: Ajit pawar, Pune, शरद पवार