• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • दोन दिवस पुणेकरांची होणार तारांबळ; यादिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

दोन दिवस पुणेकरांची होणार तारांबळ; यादिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

गुरुवारी शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

गुरुवारी शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

Pune Water Supply News: चालू आठवड्याच पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या देखभाल दुरुस्तीचं कामं करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन दिवस पुणेकरांची पिण्याच्या पाण्यासाठी तारांबळ उडण्याची शक्यता आहे.

 • Share this:
  पुणे, 31 ऑगस्ट: चालू आठवड्याच पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या देखभाल दुरुस्तीचं कामं करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन दिवस पुणेकरांची पिण्याच्या पाण्यासाठी तारांबळ उडण्याची शक्यता आहे. गुरुवारी एक दिवस शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी जपून पाणी वापरावं, असं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. शुक्रवारी उशीरा शहरात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. पण शुक्रवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस पुणेकरांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे. पर्वती जलकेंद्र पंपिंग, वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र,  लष्कर जलकेंद्र, एस एन डी टी /वारजे जलकेंद्र, नवीन होळकर भामा आसखेड, चिखली रावेत पंपिंग येथील विद्युत पंपिंग विषयक देखभाल आणि दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहेत. हेही वाचा-सायकलीवरून जाणाऱ्या 16 वर्षीय चंदाला पीएमपी बसने दिली धडक, पुण्यातील घटनेचा LIVE त्यामुळे गुरुवारी (2 ऑगस्ट) रोजी शहरात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी उशीरा कमी दाबानं पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दोन दिवस पाण्याचा जपून वापर करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. त्यानंतर शनिवारपासून शहरात पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published: