• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • पुण्यात दिवसाढवळ्या भर रस्त्यात एकाला भोसकलं : म्हाळुंगे परिसरातला थरार CCTV मध्ये कैद

पुण्यात दिवसाढवळ्या भर रस्त्यात एकाला भोसकलं : म्हाळुंगे परिसरातला थरार CCTV मध्ये कैद

टँकरद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या एका व्यावसायिकाचा म्हाळुंगे (Mahalunge Chakan) परिसरात खून (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 • Share this:
  पुणे, 18 मे : टँकरद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या एका व्यावसायिकाचा म्हाळुंगे (Mahalunge Chakan) परिसरात खून (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अतुल भोसले असे मृत व्यावसायिकाचं नाव आहे. चार ते पाच जणांच्या टोळक्यानं अचानकपणे धारदार शस्त्रानं वार करत दहशत माजवली. खुनाचा हा धक्कादायक थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या हल्ल्यात भोसले हे गंभीर जखमी झाले होते, त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना चाकण पोलिसांच्या (Chakan Police) हद्दीतील म्हाळुंगे परिसरात घडली आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे नेहमी प्रमाणे काम करण्यात व्यग्र असताना त्यांच्यावर टोळक्यानं हल्ला चढवला. घडलेल्या या प्रकारामुळं परिसरात तणावाचं वातावरण आहे. हा खुनाचा धक्कादायक थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पाणी टँकरचा व्यवसाय करणारे अतुल भोसले शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास म्हाळुंग्याच्या कमानीजवळ आले आसता आरोपी अक्षय शिवले, गणेश ढरमाळे, गोट्या भालेराव आणि त्यांच्या इतर साथीदारांनी कोयत्याने अतुल भोसले यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हे वाचा - Cyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा बचाव मोहिमेचे थरारक व्हिडिओ या भीषण हल्ल्याचा सगळा थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून चाकण पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. दिवसाढवळ्या भर वर्दळीच्या रस्त्यात हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. कुणाच्या काही लक्षात यायच्या आत हा हल्ला झाला. पोलीस पुढील तपास करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: