Home /News /pune /

पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी या भागांत पाणीपुरवठा राहणार बंद

पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी या भागांत पाणीपुरवठा राहणार बंद

Pune News Update: देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी पुण्यातील काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार (water supply in pune will cut) असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

    पुणे, 07 डिसेंबर: देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी पुण्यातील काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार (water supply in pune will cut) असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. वडगाव आणि लष्कर जलकेंद्रात देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत. त्यामुळे गुरुवारी पुणेकरांची पिण्याच्या पाण्यासाठी तारांबळ होण्याची शक्यता आहे. तारांबळ टाळण्यासाठी पुणेकरांनी गुरुवारी आणि शुक्रवारी दुपारपर्यंत पाणी जपून वापरण्याचा सल्ला पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आला आहे. पाणीपुरवठा विभागानं दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी वडगाव आणि लष्कर जलकेंद्रात विद्युत आणि स्थापत्य विषयक दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत. त्यामुळे गुरुवारी पुण्यातील बहुतांशी ठिकाणी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय विभागाकडून घेण्यात आला आहे. शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी दुपारी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दीड दिवस पाणी जपून वापरावं, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. हेही वाचा-पुण्यात बिल्डरला दिला भयंकर मृत्यू; 6 गोळ्या झाडून पाडला रक्ताचा सडा, कारण समोर पाणी पुरवठा बंद असणारा भाग: वडगाव जलकेंद्र हद्दीतील सिंहगड रस्ता, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, धनकवडी, दत्तनगर, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर आणि कोंढवा बुद्रुक याठिकाणी गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. हेही वाचा-स्पीड ब्रेकरवर PMP बस आदळून पुणेकराचा तुटला मणका; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल याव्यतिरिक्त लष्कर जलकेंद्राच्या हद्दीतील हडपसर, काळेपडळ, महंमदवाडी, सय्यदनगर, गोंधळेनगर, बी टी कवडे रस्ता, सातववाडी, आकाशवाणी, वैदुवाडी आणि साडेसतरानळी परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी दुपारी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pune

    पुढील बातम्या