Home /News /pune /

2 दिवस पुणेकरांची पाण्यासाठी होणार तारांबळ; अर्ध्या पुण्याचा पाणी पुरवठा राहणार बंद

2 दिवस पुणेकरांची पाण्यासाठी होणार तारांबळ; अर्ध्या पुण्याचा पाणी पुरवठा राहणार बंद

Water Supply Latest News Pune: पर्वती जलकेंद्र याठिकाणी नव्या जलवाहिनीचे काम करण्यासाठी पुण्यातील पाणी पुरवठा जवळपास दोन दिवस बंद राहणार आहे.

    पुणे, 01 फेब्रुवारी: पर्वती जलकेंद्र याठिकाणी नव्या जलवाहिनीचे काम करण्यासाठी पुण्यातील पाणी पुरवठा जवळपास दोन दिवस बंद राहणार आहे. बुधवारी रात्रीपासून हा पाणी पुरवठा बंद होणार असून शुक्रवारी सायंकाळी उशिरा कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू होईल, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. परिणामी गुरुवार (3 फेब्रुवारी) आणि शुक्रवारी (4 फेब्रुवारी) असे दोन दिवस पुणेकरांची पाण्यासाठी तारांबळ उडू शकते. त्यामुळे पुढील दोन दिवस पाणी जपून वापरण्याचं आवाहन पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आलं आहे. पाणी पुरवठा विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, पर्वती जलकेंद्राच्या अखत्यारीतील पर्वती एलएलआर टाकीची मुख्य जलवाहिनी आणि नव्याने बांधलेल्या जलवाहिनीचं काम केलं जाणार आहे. त्याचबरोबर नवीन होळकर व चिखली पंपिंग भाग, भामा आसखेड जलकेंद्र येथील विद्युत व स्थापत्य विषयक देखभाल दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे बुधवारी रात्रीपासून जवळपास अर्ध्या पुण्यात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिरा कमी दाबाने पाणी पुरवठा सुरळीत केला जाणार आसल्याचं पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलं आहे. याठिकाणी पाणीपुरवठा राहणार बंद.... पर्वती जलकेंद्र परिसर: शहरातील सर्व पेठा, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, भवानी पेठ आणि नाना पेठ सहकार नगर: सहकार नगर नंबर 2 सर्व भाग, शाहू वसाहत, लक्ष्मीनगर, मनपा शाळा क्र. 111 चा भाग हेही वाचा-रिक्षा मागे घेत असताना कोसळली कॅनालमध्ये, एक जण गेला वाहून, पुण्यातील घटना लष्कर जलकेंद्र परिसर: बेकर हिल जुन्या टाकीवर अवलंबून असणारा कौसर बाग परिसर, एनआयबीएम रोड, उंड्री रोड, साळुंखे विहार रोड, उजवी बाजू, लोणकर गार्डन, वानवडी परिसरातील काही भाग, कोंढवा गावठाण, भाग्योदयनगर, मिठानगर, शिवनेरीनगर, गल्ली क्रमांक एक, ब्रम्हा इस्टेट, कृष्णा केवल, फकरी हिल, कुबेरा पार्क, ब्रम्हा अव्हेन्यू, शिवगंगा कॉम्पलेक्स, निवृत्ती एन्क्लेव्ह, माउंट कार्मल स्कूल, सहानी सुजाणा पार्क, लुल्लानगर, संपूर्ण परिसर, साळुंखे विवाह रोड, केदारी नगर, आझाद नगर, शांती नगर, शिवरकर रोड, विकास नगर, जगताप नगर, शिंदे छत्री, एसआरपीएफ गट क्रमांक दोन, तात्या टोपे सोसायटी परिसरा, शिवानंद, दयानंद सोसायटी, जगताप चौक, जांभूळकर चौक परिसर, संविधान चौक परिसर, रहेजा गार्डन गंगा सॅटेलाईट परिसर. नवीन होळकर व चिखली पंपिंग भाग: विद्यानगर, टिंगरे नगर, कळस, धानोरी, लोहगाव आणि मुला रोड भामा आसखेड जलकेंद्र परिसर: लोहगाव, विमाननगर, वडगावशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर आणि येरवडा  आदी भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pune

    पुढील बातम्या