जनता कर्फ्यू मोडून घराबाहेर पडणाऱ्यांना पुण्यात पोलिसांनी दिली अजब शिक्षा, पाहा VIDEO

जनता कर्फ्यू मोडून घराबाहेर पडणाऱ्यांना पुण्यात पोलिसांनी दिली अजब शिक्षा, पाहा VIDEO

बाहेर काय सुरू आहे आणि कर्फ्यू कशा प्रकारे लागला आहे हे पाहण्याची उत्स्कुताा म्हणून लोकं बाहेर पडली. अशा लोकांना पुणे पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.

  • Share this:

पुणे, 22 मार्च : कोरोनाव्हायरसवर मात करण्यासाठी संपूर्ण देशात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मोदींनी केलेल्या या आवाहनाला संपर्ण देशातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पण अशात काही लोक घराबाहेर पडतात. बाहेर काय सुरू आहे आणि कर्फ्यू कशा प्रकारे लागला आहे हे पाहण्याची उत्स्कुताा म्हणून लोकं बाहेर पडली. अशा लोकांना पुणे पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.

पुण्यातील मंचरमध्ये काही लोक घराबाहेर पडले असता पोलिसांनी त्यांना अडवलं आणि थेट उठाबश्या काढण्याची शिक्षा दिली आहे. याचा व्हिडिओ न्यूज18 लोकमतच्या हाती लागला आहे. त्यामुळे तुम्हीदेखील विनाकारण घराच्या बाहेर पडू नका. घरात रहा, सुरक्षित रहा आणि स्वत:ची काळजी घ्या असं आवाहन आमच्याकडून देखील करण्यात आलं आहे.

भारतात कोरोनानं घेतला सहावा बळी, 38 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबईपाठोपाठ आणखी एक धक्कादाय बातमी समोर आली आहे. मुंबईत 63 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर आता बिहारमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पटनातील एम्स रुग्णालयात 38 वर्षीय तरुणावर कोरोनाचे उपचार सुरू होते. मात्र आज उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील कोरोनाग्रस्त रुग्णाचा हा पहिला आजचा दिवसातला दुसरा तर भारतातील आतापर्यंत 6 वा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 324 वर पोहोचली आहे तर महाराष्ट्रात आतापर्यंत 74 रुग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाची संख्या वाढली

महाराष्ट्रामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून ती आता 74वर पोहोचली आहे. काही तासांमध्ये हे आकडे वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. आता संपूर्ण देशात रुग्णांचा आकडा 324वर पोहोचला आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या काही तासांत कोरोनाचे 10 नवे रुग्ण समोर आले आहेत. यातील 6 रुग्ण मुंबईतील असून इतर 4 रुग्ण पुण्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, भारतात (India) कोरोनाव्हायरस (Coronavirus) वेगाने पसरतो आहे. काल फक्त 24 तासांत तब्बल 98 रुग्ण आढळले होते. आता यामध्ये आणखी रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 324वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 74 रुग्ण आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2020 12:24 PM IST

ताज्या बातम्या