मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

राजू शेट्टींचं नाव आमदारकीच्या यादीतून वगळलं का? शरद पवारांचा मोठा खुलासा

राजू शेट्टींचं नाव आमदारकीच्या यादीतून वगळलं का? शरद पवारांचा मोठा खुलासा

राजू शेट्टींना दिलेला शब्द आम्ही पाळलाय, आता यावर त्यांनी काय विचार व्यक्त केलेत यावर मी बोलणार नाही'

राजू शेट्टींना दिलेला शब्द आम्ही पाळलाय, आता यावर त्यांनी काय विचार व्यक्त केलेत यावर मी बोलणार नाही'

'राजू शेट्टींना दिलेला शब्द आम्ही पाळलाय, आता यावर त्यांनी काय विचार व्यक्त केले आहे, यावर मी बोलणार नाही'

पुणे, 04 ऑगस्ट : गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा (mlas appointed by governor) तिढा लवकरच सुटण्याच्या मार्गावर आहे. पण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (raju shetty)  यांचं नाव वगळण्यात आल्याचं वृत्त समोर आले. पण, राजू शेट्टींना दिलेला शब्द आम्ही पाळलाय, आता यावर त्यांनी काय विचार व्यक्त केलेत यावर मी बोलणार नाही' असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी वृत्त फेटाळून लावले आहे.

पुण्यात शरद पवारांच्या हस्ते कर्वेनगरमधील डॉ. एपीजे अब्दुल कलाम ई लर्निंग स्कूलच्या कोनशिलेचं अनावरण करण्यात आले. पुणे मनपाने ही अत्याधुनिक शाळा उभारली आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने यांच्या वार्डात 8 कोटी खर्च करून ई लर्निंग शाळा उभारली गेली आहे. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत असताना शरद पवार यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.

Tokyo Paralympics मध्ये भारताला चौथं गोल्ड, प्रमोद भगतने इतिहास घडवला

राजू शेट्टी यांचं सहकार कृषीक्षेत्रातलं योगदान लक्षात घेऊनच आम्ही त्यांचं नाव राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत दिले होते. पण पुढे काय झालं माहित नाही. राज्यपालांकडे तो विषय प्रलंबित आहे. आम्ही तरी त्यांचं नाव यादीतून वगळलेलं नाही' असं स्पष्ट खुलासा शरद पवार यांनी केला.

तसंच, 'राजू शेट्टींना दिलेला शब्द आम्ही पाळलाय, आता यावर त्यांनी काय विचार व्यक्त केले आहे,  यावर मी बोलणार नाही' असंही पवार म्हणाले.

सरकारी अधिकाऱ्यांना आता दररोज 5 मिनिटांचा मिळणार 'योग ब्रेक'; नवा आदेश

अनेक मंत्री आणि आमदारांवर ईडीकडून कारवाई केली जात आहे, असा सवाल पत्रकारांनी विचारला असता पवार म्हणाले की, 'केंद्र सरकारकडून अशा संस्थांचा वापर सध्या विरोधकांना नमवण्यासाठी केला जात आहे आणि हे दूर्दैवी आहे' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

तसंच, मंदिर उघडण्याची भाजप मागणी करत आहे. पण विरोधकांनी याबाबत तारतम्य बाळगण्याची आवश्यकता आहे. कोविडबद्दल केंद्र सरकारने राज्य सरकारला काही नियमावली दिली आहे. आणखी काही दिवस खबरदारी घ्यायची गरज आहे असा निर्देश आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ती काळजी घेत आहेत, अन्य घटक काही दुसरे मत असेल तर लोकशाही आहे. केंद्र सरकारच्या विचारांची लोक आहेत त्यांनी तारतम्य ठेवण्याची गरज आहे' असा टोलाही शरद पवारांनी विरोधकांना लगावला.

अकोल्यात महिला तलाठ्याचा प्रताप, मोबाइलवर मारला डल्ला; CCTVमध्ये पकडली गेली चोरी

'दिल्लीमध्ये शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाला. इतके दिवस दिल्लीत शेतकरी बसले आहेत, त्यांची दखल केंद्र सरकारने घ्यायला हवी होती. पण दुर्दैव आहे. अनेक राज्यात असं होत आहे पण अन्य राज्यात ही हा विषय आहे' अशी नाराजीही पवारांनी व्यक्त केली.

First published:

Tags: Raju shetty, Sharad pawar, राजू शेट्टी, शरद पवार