• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या एका निर्णयामुळे दोन जीव वाचले; अखेर आई-नवजात बाळ पुण्याला रवाना

प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या एका निर्णयामुळे दोन जीव वाचले; अखेर आई-नवजात बाळ पुण्याला रवाना

गर्भवती महिलेला कोरोनाची लागण (Pregnant lady tested positive) झाल्याचे समोर आले. पण विलंब होऊ नये म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रातच प्रसुती करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.

 • Share this:
  पुणे, 30 एप्रिल : कोरोनाच्या रुग्णांवर उपचार (corona treatment) करणं म्हणजे सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांना (Health Workers) स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करावं लागतं. त्यात जर कोरोनाग्रस्त गर्भवती महिला (corona posotive ladys delivery) असेल आणि तिची प्रसुती करणं हे अत्यंत जिकरीचं काम असतं. मात्र खेड तालुक्यातील वाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (wada Primary Health Center) कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वीरित्या फत्ते केली. (वाचा-सुप्रीम कोर्टात Covid-19 च्या लढ्यातल्या मदतीबद्दल रिलायन्सचं कौतुक) गरोदर असलेल्या वैशाली वाडेकर या 24 वर्षीय महिलेला शुक्रवारी अचानक पोटात दुखायला लागलं. त्यामुळं कुटुंबीयांनी लगेचच त्यांना घेऊन वाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. याठिकाणी या गर्भवती महिलेला दाखल करण्यात आलं. पण वैशाली यांना दोन ते तीन दिवसांपासून कोरोनाची लक्षणं होती. सर्दी व खोकला असल्याने डॉक्टरांनी त्यांना अँटिजेन टेस्ट करण्याचा सल्ला दिला. या टेस्टमध्ये वैशालीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. (वाचा-तुम्हीच ठरवा कोणती कोरोना लस योग्य? मोदी सरकारने सर्वसामान्यांवर सोपवला निर्णय) कोरोनाची लागण असल्याने महिलेला पुण्यातील रुग्णालयात पाठवावे लागणार होते. पण महिलेला प्रसुती कळा सुरू झाल्या होत्या. त्यामुळं उशीर झाला असता तर आई आणि बाळ दोघांचाही जीव धोक्यात आला असता. त्यामुळं डॉक्टरांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातच या महिलेली प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. येथील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे ही प्रसुती केली. महिलेची नैसर्गिक प्रसुती झाली आणि तिनं मुलाला जन्म दिला. प्रसुतीनंतर बाळ आणि आई दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. प्रसुतीनंतर उपचारासाठी बाळ आणि आई दोघांना पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठवण्यात आलं. वेळीच निर्णय घेऊन मोठ्या रुग्णालयाकडं बोट न दाखवता महिलेची प्रसुती केल्यानं, दोन जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं. त्यामुळं वाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचारी यांचं कौतुक केलं जात आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाग्रस्त महिलेच्या प्रसुतीची ही पहिलीच घटना असल्याची चर्चा आहे.
  Published by:News18 Desk
  First published: