पुणे, 14 जानेवारी : पुण्यातील वेगवेगळ्या वास्तू या शहराच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक वैभवात भर टाकतात. पुणेकरांना अभिमान वाटावा आणि बाहेरगावच्या व्यक्तींनी पुण्यात आल्यावर हमखास पाहावी अशी एक वास्तू म्हणजे राजा दिनकर केळकर संग्रहालय. स्वातंत्र्यपूर्व काळात या म्युझियमची स्थापना झाली. त्यानंतर आजपर्यंत हे म्युझिम आपली शान आणि पुण्याचं वैभव टिकवून आहे. आता या संग्रहालयाच्या वैभवात लवकरच आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
केळकर संग्रहालय आता लवकरच मेटाव्हर्समध्ये रुपांतरीत होणार आहे. संग्रहालयाचे व्यवस्थापकीय संचालक सुधान्वा रानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,'भारतव्हर्सनी या कामात विशेष पुढाकार घेतला आहे. त्यांनी याबाबत संग्रहालयाशी सामंजस्याचा करार केला असून यामध्ये नेत्रचिकित्सक डॉ. श्रीकांत केळकर यांचीही मदत घेतली जाणार आहे.
कोल्हापूरहून विद्युत मार्गावर धावतेय रेल्वे, पाहा कसा होतोय फायदा Video
मेटाव्हर्सचा फायदा काय?
मेटाव्हर्स तंत्रज्ञानाद्वारे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून आपल्याला राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या पुरातन वस्तू पाहता येणार आहेत. तसेच यांचा इतिहास देखील आपल्याला मेटाव्हर्स टेक्नॉलॉजीद्वारे ऐकता येईल. श्राव्य आणि दृश्य माध्यमातून द्वारे आपल्याला राजा दिनकर केळकर संग्रहालयातील हजारो सातव्या शतकापासूनच्या विविध मूर्ती, विविध कला कुसरीच्या वस्तू, दगडी, हस्तिदंताच्या, लाकडी कोरी काम केलेला असंख्य जुन्या राजा राजवाड्यांच्या दरवाजे, कमानी, खिडक्या अशा असंख्य गोष्टींचा संग्रह या टेक्नॉलॉजीद्वारे घरबसल्या पाहता येणार आहे.
'या तंत्रज्ञानाबद्दलचे तिकीट अजून माहिती सांगितली गेली नाहीये. संग्रहालयाकडून लवकरच कशाप्रकारे मेटाव्हर्स तंत्रज्ञानाद्वारे संग्रहालय पाहता येईल आणि त्याची किती खर्च असेल याविषयीची माहिती देण्यात येईल,' असं रानडे यांनी सांगितलं.
गुगल मॅपवरून साभार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.