पिंपरी चिंचवड हादरलं, भीषण स्फोटाचा LIVE VIDEO

पिंपरी चिंचवड हादरलं, भीषण स्फोटाचा LIVE VIDEO

पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात मॅग्नेशियमची पावडर बनवणाऱ्या कंपनीत दुपारच्या सुमारास आग लागली होती.

  • Share this:

 

पिंपरी चिंचवड, 24 एप्रिल : पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) थेरगावात एका खासगी कंपनीत भीषण स्फोट (blast)झाल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. ज्यावेळी स्फोट झाला त्याचा एक व्हिडीओ समोर आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात  मॅग्नेशियमची पावडर बनवणाऱ्या कंपनीत दुपारच्या सुमारास आग लागली होती. आग लागल्यानंतर  भीषण स्फोट घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे.

आत्तापर्यंत एकापाठोपाठ असे 4 स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. तर स्फोटामुळे लागलेली आग अजूनही वाढत आहे.

या  स्फोटाच्या धक्क्याने आजूबाजूच्या घराच्या भिंतींनाही तडे गेले आहेत. स्फोटानंतर लागलेल्या आगीत मॅग्नेशियम पावडरने पेट घेतला. मात्र, ही आग विझविण्यासाठी पाण्याचा वापर करता येत नसल्याने आग विझेपर्यंत अग्निशमन दलास प्रतिक्षा करावी लागणार आहे.

जामनगरमधून ऑक्सीजनचा कोटा कमी, अजित पवारांची केंद्राला विनंती

सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नसून कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही कंपनी अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे.

Published by: sachin Salve
First published: April 24, 2021, 6:54 PM IST

ताज्या बातम्या