Home /News /pune /

मोबाइल गेमिंगमध्ये न अडकता पुण्यातल्या विराजने वेळ लावला सत्कारणी, Lockdownमध्ये तयार केली Website

मोबाइल गेमिंगमध्ये न अडकता पुण्यातल्या विराजने वेळ लावला सत्कारणी, Lockdownमध्ये तयार केली Website

विराटने कोरोनासंदर्भातील सर्व माहिती देणारी वेबसाइट तयार केली आहे.

पुणे, 18 मे : कोरोना काळात विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. मात्र अनेक मुलं खचून न जाता सुट्टी enjoy करताना दिसत आहेत. पुण्यातील विराज शहा या  नुकत्याच 10 व्या इयत्तेत गेलेल्या शालेय विद्यार्थ्याने कोरोनाविषयी एक आगळी वेगळी web side बनवली आहे. 'सबकुछ कोरोना' किंवा 'A to Z कोरोना' असं या संकेतस्थळाचं स्वरूप आहे. www. jeevan-raksha.com हे वेबसाईटचं नाव आहे. पुण्यातील मार्केट यार्ड इथं राहणारा आणि दस्तुर शाळेत शिकणाऱ्या विराजच्या web side चं launching नुकतच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं आणि महापौरांनीही कौतुक करत विराजला शाबासकीची थाप ही त्यांनी दिली. विराजचे काही नातेवाईक, मित्र-मैत्रिणी कोरोना बाधित झाले. त्यांचा संघर्ष-struggle बघून विराजला ही कल्पना सुचली. शाळा बंद असल्याने विराजने सुट्टी सत्कारणी लावली आहे. या वेबसाईटमध्ये कोरोना विषयी इत्यंभूत माहिती आहे. कोरोना म्हणजे काय? अलगीकरण आणि विलगीकरण यात नेमका फरक काय? कोरोनाची लक्षणे काय आहेत? कोरोना वरील विविध लशींची माहिती देण्यात आलीय...लशी करता रजिस्ट्रेशन कसं करायचं याचं मार्गदर्शन आहे. विविध उपचार पद्धती कोणत्या आहेत. होमिओपॅथी, आयुष औषधे ते वेगवेगळी इंजेक्शन यांची माहिती देण्यात आली. हे ही वाचा-पुणे जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी निघाला 'बेड सेटर'; खाटांसाठी लाखोंची मागणी लहान मुलं, जेष्ठ नागरिक यांनी घ्यावयाची काळजी याविषयी सांगण्यात आलं आहे.. प्लाझ्मा थेरपीची, रक्तदान याविषयी माहिती देण्यात आली आहे. प्लाझ्मा दात्यांची यादीही देण्यात आली आहे. जेणेकरून प्लाझ्मा दात्यांशी संपर्क साधून प्लाझ्मा मिळेल. थोडक्यात कोरोना विषयी सर्व काही अशी ही अनोखी web site त्यानं बनवली आहे. या वेबसाइटला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. केवळ पुस्तकी माहिती न देता विविध डॉक्टर्सचे ऑडिओ, व्हिडिओ, कोविड हॉस्पिटल, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर कुठं उपलब्ध आहेत ही ताजी माहितीदेखील या वेबसाईटदमध्ये मिळते. Live फीडबॅक ही देता येतो, प्रश्नोत्तरे ही करता येतात. हे या live, online updated वेबसाईटचं वेगळेपण आहे. विरंगुळा म्हणून वेगवेगळे online गेम्स ही खेळता येतात. विशेष म्हणजे कोणताही कमर्शियल किंवा व्यावसायिक हेतू न ठेवता पालक of town असलेल्या कोरोना विषयी नेमकी, updated, शास्त्रीय आणि उपयुक्त माहिती मिळावी हा या उपक्रमामागचा हेतू आहे. ज्या पद्धतीने फीडबॅक किंवा प्रतिसाद मिळतोय यावरून तो सफल झाला असे म्हणायला हरकत नाही. विराजने अत्यंत लहान वयात जिद्द, मेहनत, चिकाटी असेल तर कोरोनासारख्या महामारीत शालेय विद्यार्थी विद्यार्थीनीही योगदान देऊ शकतात हे दाखवून दिलं आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Corona updates, Coronavirus, Pune

पुढील बातम्या