मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

खेड सभापतीविरोधातील अविश्वास ठरावाला हिंसक वळण; राजगुरूनगरमध्ये संचारबंदीची घोषणा

खेड सभापतीविरोधातील अविश्वास ठरावाला हिंसक वळण; राजगुरूनगरमध्ये संचारबंदीची घोषणा

Curfew in Rajgurunagar: खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठराव आणि त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडीनंतर या प्रकरणाला हिंसक वळण लागलं आहे. त्यामुळे आज सकाळी 6 वाजेपासून राजगुरूनगरमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

पुढे वाचा ...
    राजगुरूनगर, 31 मे: खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठराव आणि त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडीनंतर या प्रकरणाला हिंसक वळण लागलं आहे. त्यामुळे आज सकाळी 6 वाजेपासून राजगुरूनगरमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. याठिकाणी स्थानिक पोलिसांच्या ताफ्यासह दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आलं आहे. अविश्वास ठरावानंतर होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर हिंसा होऊ नये, यासाठी सतर्कता म्हणून ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंचायत समिती इमारतीच्या आसपास अर्धा किलोमीटरपर्यंत कोणासही येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्याविरुद्ध एकूण 14 पंचायत समिती सदस्यांपैकी 11 जणांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यानंतर या अकरा सदस्यांना पुण्याजवळील डोणजे येथील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं होतं. पण 27 मे रोजी पहाटे सभापती व त्यांच्या काही समर्थकांनी संबंधित रिसॉर्टवर जावून जबरदस्त राडा घातला होता. याप्रकरणी सभापती पोखरकर यांना दुसऱ्याच दिवशी अटक करण्यात आली आहे. असं असलं तरी, खेड पंचायत समितीच्या इमारतीत अविश्वास ठरावाबाबत होणाऱ्या मतदानाला पोलीस अटकेत असणारे पोखरकर हजर राहणार आहेत. त्यामुळे मतदानादरम्यान हिंसा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजगुरूनगरमध्ये आज सकाळी 6 वाजेपासूनच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. सकाळी 11 वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार आहे, मतदानाचं सर्व कामकाज पूर्ण होईपर्यंत राजगुरूनगरमध्ये संचार बंदी लागू असणार आहे. हे ही वाचा-मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन प्रकरण; नागपुरातून एकाला अटक दरम्यान आमदार दिलीप मोहिते आणि माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यातही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. अतिशय तणावपूर्ण वातावरणात होत असलेल्या या ठरावावरील मतदानाकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागलं असून शिवसेनेचे सदस्य काय भूमिका घेतात, याबाबत विशेष औत्सुक्य आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune

    पुढील बातम्या