• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याला तिव्र विरोध, विनायक मेटेंनी दिला सज्जड इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याला तिव्र विरोध, विनायक मेटेंनी दिला सज्जड इशारा

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाविषयीचा आवाज ऐकला नाही तर येत्या 17 ऑगस्टला राज्यात आंदोलन...

  • Share this:
पुणे, 8 ऑगस्ट: मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी झोपेलल्या सरकारला जाग मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली 13 मराठा संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीत सरकार विरोधात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या (9 ऑगस्ट) क्रांती दिनी नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांचा मराठा समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात येणार आहे. काळे कपडे परिधान करून आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे. हेही वाचा...शिवाजी महाराजांचा पुतळा सरकारनं रातोरात हटवला, शिवभक्तांमध्ये संतापाची लाट मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या त्यांचा नाशिकचा दौरा रद्द केला तर पुण्यातील बालगंधर्व चौकात मराठा समनव्य समितीकडून जागरण गोंधळ घालत सरकारला जाब विचारला जाईल. त्याचबरोबर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी असलेल्या उपसमितीवरुन मंत्री अशोक चव्हाण यांना हटवा, अशी मागणी केली आहे. आज पुण्यात मराठा समनव्य समितीची बैठक पार पडली यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विनायक मेटे यांनी दिली आहे. ..अन्यथा 17 ऑगस्टला आंदोलन मराठी आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार निष्काळजीपणा दाखवत आहे. राज्य सरकारनं मराठा समाजाच्या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष केले आहे. याला सर्वस्वी अशोक चव्हाण हे जबाबदार आहे. त्याच्याच नाकर्तेपणामुळे सुप्रीम कोर्टात आरक्षणाचा मुद्दा गेला आहे, अशी टीका विनायक मेटे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाविषयीचा आवाज ऐकला नाही तर येत्या 17 ऑगस्टला राज्यात सर्वत्र आंदोलन छेडण्यात येईल. राज्य सरकार आपली भूमिका जाहीर करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन पुढे सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चानं केली मोठी तयारी..  औरंगाबाद येथे मराठा समाजाच्या न्याय्य हक्काच्या आंदोलनाची मोठी तयारी सुरू आहे. सरकार विरोधात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने ही तयारी केली जात आहे. त्यामुळे राज्यात सत्तेवर आलेल्या उद्धव ठाकरे सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हेही वाचा...काळ आला होता पण... भरधाव ट्रक घुसला घरात, नंतर काय झालं पाहा VIDEO क्रांती चौक येथून या आंदोलनाला शनिवारी सकाळीच सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र, अजून आंदोलकांना पोलिसांनी अटकाव केलेला नाही. आंदोलनात आत्महत्या केलेल्या मराठा बांधवांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटील यांनी घेतली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published: