पिंपरी चिंचवड, 31 जुलै : पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) पिंपळेगुरव (Pimplegurav) परिसरात गॅस पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनला अचानक स्फोट झाला आहे. या स्फोटात 2 दुचाकीस्वार जखमी झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पिंपळेगुरव (Pimplegurav) परिसरात गॅस पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनचा आज दुपारी अचानक स्फोट झाला आणि आग लागली. ही आग इतकी भीषण आहे की, परिसरात आगीच्या ज्वाळा उंच जात आहे तर धुरांचं लोटही सर्वत्र पसरले होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या या स्फोटामुळे दोन दुचारीस्वार जखमी झाले आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पिंपरीतील रामकृष्ण चौक शेजारी असलेल्या पेरूच्या बागेल लगत ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्या नुसार, पावसाळी कामासाठी रस्ते खोदाई करणाऱ्या JCB चा धक्का लागून MNGL ची पाईप लाईन फुटल्यामुळे त्यातून गॅस लिकेज झाला आणि अचानक आग लागली. ह्या वेळी दुचाकी वाहन जात असताना त्याचा आपल्याला वाहनावरील ताबा सुटला आणि अपघात झाला तर या आगीत दुचाकी वाहन जळून खाक झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
मे महिन्यात सुद्धा अशीच घटना घडली होती. पिंपळेगुरव परिसरातील काटेपूरम चोका जवळील राम नगरच्या रस्त्या लगत MNGLच्या (Maharashtra Natural Gas Limited pipeline) पाईप लाईन च्या दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यावेळी गॅस गळती झाली आणि आचनाक आग लागली. सुरिवातीला आग सौम्य होती. मात्र काही सेकंदात आगीने रौद्ररूप धारण केलं आणि रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या चार चाकी वाहनं आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. बघता-बघता एक दोन नाही तर तब्बल 5 वाहनांनी पेट घेतला. या आगीत पाचही कार जळून खाक झाल्या होत्या.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदल दाखल झाल आणि त्यांनी सुमारे 1 तासांच्या प्रयत्न नंतर ही आगिवर पूर्णतः नियंत्रण मिळवलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा तशीच घटना घडली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.